गुगल मॅपच्या लेटेस्ट अपडेटसह नवीन फीचर्सचा देखील यात सहभाग आहे. या नव्या फीचरमध्ये Explore, Commute, Save, Contribute and Updates या पाच टॅबचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वी युजर्सना Commute, Explore हे दोन टॅबच केवळ वापरता येत होते. मात्र, आता या टॅबच्या मदतीने सर्व ठिकाणांची रेटींग, त्यासोबतच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती मिळणार आहे. Commute टॅबच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी जवळचे आणि सोपे रस्ते कोणते आहेत हे पाहता येणार आहे. या टॅबकरीता युजर्सना आपले रोजच्या प्रवासाचे रूटीन सेट करावे लागणार आहे.
गुगल मॅपने खास भारतीयांसाठी नवे फिचर्स आणले आहेत, याद्वारे युजर्सना त्यांच्या घरचा आणि ऑफिसचा पत्ता सेव्ह केल्यावर मॅपच्या सहाय्याने त्यांना वाहतूक कोंडी आणि पर्यायी रस्त्यांची माहिती मिळणार आहे. याद्वारे युजर्स आजुबाजूच्या जागांची माहिती मिळणार आहे. यातून व्यवसायिकाशी थेट संपर्क साधता येणार आहे. युजर्स या माध्यमातून केवळ रिव्हू किंवा रेटींग न देता व्हिडिओ देखील अपलोड करू शकतात. गुगलकडून, असे अनेक फिचर्स हे केवळ भारतीयांसाठी तयार करण्यात आले आहेत. यामध्ये दुचाकी मोड आणि प्रवासाचा वेळ देखील समाविष्ट आहे.