Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

गुगलच्या 'व्हॉइस सर्च' मध्ये बोला मराठीत

google search engine
, मंगळवार, 15 ऑगस्ट 2017 (23:02 IST)
सर्च इंजिन गुगलने 30 अन्य भाषांमध्ये 'व्हॉइस सर्च' ची सुरूवात केली आहे. यामध्ये आठ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये मराठीचाही समावेश आहे. यापूर्वी गुगल केवळ हिंदी आणि इंग्रजीमध्येच ही सेवा देत होतं. 
 
''भारतीयांना चांगली सेवा देण्यासाठी गुगल प्रयत्नशील आहे. भारतातून वेगवेगळ्या भाषिकांनी गुगल वापरण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे.  आवाजाचे वेगवेगळे नमुने मिळवण्यासाठी भारतीय भाषा बोलणा-यांसोबत गुगल काम करत आहे. एका अहवालानुसार 2021 पर्यंत गुगलवर भारतीय भाषांचा वापर करणा-यांची संख्या जवळपास 53.6 कोटी  होईल. आता जगभरात गुगल व्हॉइस सर्च 119 भाषांना सपोर्ट करतं.'' गुगलचे टेक्निकल प्रोग्रॅम मॅनेजर दान व्हॅन एस्क यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबत माहिती दिली.  

यासाठी व्हॉइस सर्चसाठी सर्वात आधी पहिले गुगल प्ले स्टोअरवरून जीबोर्ड अॅप इन्स्टॉल करा. त्यानंतर  व्हॉइस सेटिंगमधून तुमच्या आवडीच्या भाषेचा पर्याय निवडावा. मग जी माहिती हवी असेल ते बोलून सर्च करता येईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'त्या' पाकिस्तानी महिलेला मेडिकल व्हिसा