आधार कार्डचे जेवढे फायदे आहे तेवढेच त्याच्या सुरक्षतेबद्दल देखील तुम्हाला सावध राहण्याची आवश्यकता आहे. आजकाल आधार कार्डसोबत बनावट आणि छेडखानीच्या बर्याच तक्रारी येत आहे. अशात जरूरी आहे की तुम्हाला या गोष्टीची माहिती असायला पाहिजे की तुमच्या आधारकार्डचा वापर केव्हा, कुठे आणि कसा झाला आहे. तर जाणून घेऊ योग्य पद्धत ...
सर्वात आधी तुम्ही uidai ची वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा. येथे तुम्हाला 'Aadhaar Authentication History'चा विकल्प दिसेल ज्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
हा विकल्प तुम्हाला माय आधार सेक्शनमध्ये दिसेल. त्याशिवाय तुम्ही https://resident.uidai.gov.in/aadhaar-auth-history या लिंकवर क्लिक करून सरळ जाऊ शकता.
यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारण्यात येईल. आता 12 अंकांचा आपला आधार नंबर एंटर करा आणि नंतर सिक्योरिटी कॅप्चर टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा. यानंतर आधारासोबत रजिस्टर्ड तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
ओटीपी सबमिट केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की तुमचा आधार कार्ड केव्हा आणि कुठे वापरण्यात आला आहे, पण हा रेकॉर्ड फक्त मागील 6 महिन्यांचाच मिळेल.