Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरी बसल्या करा बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन

घरी बसल्या करा बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन
!!बारा ज्योतिर्लिंग!!
 
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोंकारंममलेश्वरम्॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥
एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥
एतेशां दर्शनादेव पातकं नैव तिष्ठति। कर्मक्षयो भवेत्तस्य यस्य तुष्टो महेश्वराः॥: 
 
बारा ज्योर्तिलिंगाचे नावानुरूप मंत्र दररोज जपल्याने पापांचा विनाश होतो.
 
१. श्री सोमनाथ, वेरावळ, सौराष्ट्र, गुजरात
सोमनाथ मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र प्रांताच्या काठियावाडा भागाच्या प्रभासमध्ये विराजमान आहे. या भागेत प्रभू श्रीकृष्णाने यदु वंशाचा संहार झाल्यावर आपली लीला संपवली होती. जरा नावाच्या शिकार्‍याने आपल्या बाणाने त्यांचे चरण भेदले होते.
webdunia
२. श्री मल्लिकार्जुन, श्रीशैल्य, आंध्रप्रदेश
आंध्र प्रदेशाच्या कृष्णा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी श्रीशैल पर्वतावर श्रीमल्लिकार्जुन विराजमान आहे. याला दक्षिणचे कैलाश असे देखील म्हणतात. महाभारतानुसार श्रीशैल पर्वतावर महादेवाचे पूजन केल्याने अश्वमेध यज्ञ केल्याचं फल प्राप्त होतं. श्रीशैल शिखराचे दर्शन केल्याने सर्व प्रकाराचे कष्ट दूर होतात. अनंत सुखांची प्राप्ती होते.
webdunia
३. श्री महाकालेश्वर, उज्जैन, मध्यप्रदेश
तृतीय ज्योतिर्लिंग महाकाळ किंवा ‘महाकाळेश्वर’ या नावाने प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये स्थित महादेवाचं हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आणि भव्य आहे.
webdunia
४. श्री ओंकारेश्वर, ओंकार, मांधाता, मध्यप्रदेश
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग सोबतच ममलेश्वर ज्योतिर्लिंग देखील आहे. या दोन्ही शिवलिंगांची गणना एकच ज्योतिर्लिंग रूपात केली गेली आहे. ओंकारेश्वर मालवा क्षेत्रात आहे.
webdunia
५. श्री केदारनाथ, उत्तरांचल, हिमालय
हे ज्योतिर्लिंग हिमालयाच्या शिखरावर विराजमान श्री ‘केदारनाथ’ चे आहे. श्री केदारनाथाला ‘केदारेश्वर’ देखील म्हटलं जातं. या शिखराहून पूर्व दिशेत अलकनंदा नदीच्या काठी प्रभू श्री बद्रीचे विशाल मंदिर आहे. केदारनाथाचे दर्शन केल्याविना बद्रीनाथची यात्रा निष्फल आणि व्यर्थ मानली गेली आहे.
webdunia
६. श्री भीमाशंकर, खेड, महाराष्ट्र
या ज्योतिर्लिंगाचे नाव ‘भीमशंकर’आहे. हे स्थळ महाराष्ट्रात मुंबईहून पूर्व आणि पुण्याहून उत्तराकडे स्थित आहे. हे भीमा नदीच्या किनारी सह्याद्री पर्वतावर आहे. भीमा नदी याच पर्वताहून निघते.
webdunia
७. श्री विश्वेश्वर, वाराणसी, उत्तरप्रदेश
सप्तम ज्योतिर्लिंग काशीमध्ये विराजमान ‘विश्वनाथ’ ला सप्तम ज्योतिर्लिंग म्हटले गेले आहे. तीन लोकात काशीला न्याय नगरी मानले गेले आहे. ही नगरी महादेवाच्या त्रिशूळावर विराजमान आहे. विश्वेश्वर ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशाच्या वाराणसी जनपदाच्या काशी नगरात स्थित आहे. याला आनंदवन, आनंदकानन, अविमुक्त क्षेत्र आणि काशी अनेक नावाने ओळखलं जातं.
webdunia
८. श्री त्र्यंबकेश्वर, नाशिकजवळ, महाराष्ट्र
अष्टम ज्योतिर्लिंगाला ‘त्र्यंबक’ नावाने देखील ओळखलं जातं. हे नाशिक जिल्ह्याच्या पंचवटीहून सुमारे अठरा मैल अंतरावर स्थित आहे. हे मंदिर ब्रह्मगिरीजवळ गोदावरी नदीच्या काठावर स्थित आहे. याला त्र्यंबक ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर देखील म्हणतात. येथे ब्रह्मगिरी पर्वताहून गोदावरी नदी निघते. ज्या प्रकारे उत्तर भारताहून प्रवाहित होणार्‍या पवित्र गंगा नदीचे विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे त्याच प्रकारे दक्षिणेत प्रवाहित होणार्‍या या पवित्र गोदावरी नदीचे देखील विशेष महत्त्व आहे.
webdunia
९. श्री वैद्यनाथ, परळी, बीड, महाराष्ट्र
नवम ज्योतिर्लिंग ‘वैद्यनाथ’ हैं। महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील परळी येथे स्थित या जागेला चिताभूमी देखील म्हटले गेले आहे. 
webdunia
१०. श्री नागेश्वर, औंढा, हिंगोली, महाराष्ट्र
भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणार्‍या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक. 
webdunia
११. श्री रामेश्वर, तामिळनाडू
दशम ज्योतिर्लिंग ‘रामेश्वर’ आहे. रामेश्वरतीर्थ ला सेतुबंध तीर्थ देखील म्हटलं जातं. हे स्थळ तामिळनाडूच्या रामनाथम जनपदात स्थित आहे. येथे समुद्र किनारपट्टीवर प्रभू रामेश्वरमचे विशाल मंदिर शोभित आहे. हे हिंदूच्या चार धाम यातून एक आहे.
webdunia
१२. श्री घृष्णेश्वर, औरंगाबाद, महाराष्ट्र
एकादशवां ज्योतिर्लिंग ‘घृष्णेश्वर है। हे महाराष्ट्राच्या दौलताबाद येथून अठरा किलोमीटर लांबीवर बेरूलठ गावाजवळ आहे. या स्थळाला ‘शिवालय’ देखील म्हटले गेले आहे. घृष्णेश्वराला लोक घुश्मेश्वर किंवा घृष्णेश्वर देखील म्हणतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

14 रुद्राक्षांची अचूक माहिती, प्रत्येक रुद्राक्ष देतं अलभ्य लाभ