Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रुद्राक्ष : काय महिला धारण करु शकतात?

रुद्राक्ष : काय महिला धारण करु शकतात?
श्रावण महिना महादेवाची आराधना करण्यासाठी श्रेष्ठ आहे. महादेवाला प्रिय सर्व वस्तू श्रावण महिन्यात महादेवाला अर्पित केल्या जातात तसेच रुद्राक्ष धारण करणारे देखील या महिन्यात हे कार्य संपन्न करतात.
 
पौराणिक कथेप्रमाणे रुद्राक्षाला महादेवाच्या डोळ्याचे अश्रु मानले गेले आहे.
 
वास्तविक रूपात रुद्राक्ष एक फळाची बी किंवा कोय या प्रमाणे आहे. या वृक्षाची सर्वाधिक पैदावार दक्षिण पूर्व अशियात होते. रुद्राक्षाचे झाड एक सदाबहार वनस्पती आहे ज्याची लांबी 50 ते 60 फ़ीट पर्यंत असते.
 
रुद्राक्षाच्या झाडाचे पानं लांब असतात. हे एक कठोर तना असलेलं झाड असतं. रुद्राक्षाच्या झाडाच्या फुलांचा रंग पांढरा असतो आणि याला लागणारे फळ सुरुवातीला हिरवे आणि पकल्यावर निळे आणि वाळल्यावर काळ्या रंगाचे 
 
होतात. रुद्राक्ष याच काळ्या फळाची बी असते. यात भेगांसारख्या दिसणारी रेगा असातत ज्याला प्रचलित भाषेत रुद्राक्षाचं मुख असे म्हटलं जातं.
 
यांची संख्या 1 ते 14 असू शकते. पौराणिक मान्यतेनुसार एकमुखी रुद्राक्ष अती शुभ मानले गेले आहे. याला साक्षात् महादेव स्वरूप मानले गेले आहे, तसेच दोन मुखी रुद्राक्षाला महादेव- पार्वती यांचे संयुक्त रूप मानले गेले आहे.
 
अनिष्ट ग्रहांच्या शांती हेतू रुद्राक्ष धारण करण्याची मुख्य भूमिका असते. रुद्राक्षाला लाल रेशमी दोर्‍यात धारण केल्याने अनिष्ट ग्रहांच्या दुष्प्रभावात कमी येते.
 
तसं तर महिल रुद्राक्ष धारण करत नाही अशी परंपरा नाही तरी अधिकश्या साध्वी रुद्राक्ष धारण करत असताना बघण्यात येते. परंतू हल्ली महिलांमध्ये देखील रुद्राक्ष धारण करण्याची प्रवृत्ति वाढली आहे. आमच्या मते महिला 
 
रुद्राक्ष धारण करत असल्या तर त्यांनी अशुद्धावस्था येण्यापूर्व रुद्राक्ष काढून ठेवावं आणि शुद्धावस्था प्राप्त झाल्यावर पुन: धारण करावं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आदित्य हृदय स्तोत्र पाठ : जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्रगतीसाठी