Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 20 March 2025
webdunia

श्रावण मास 2019: महादेवाचा पवित्र महिना, काय खरेदी कराल पहिल्या दिवशी

श्रावण मास 2019: महादेवाचा पवित्र महिना, काय खरेदी कराल पहिल्या दिवशी
या वर्षी श्रावण मास 2 ऑगस्ट 2019 पासून सुरू होत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र शिव प्रतीक किंवा शुभ सामुग्री घरात आणल्याने विविध समस्या, संकट आणि अडचणींपासून मुक्ती मिळते.
 
तर जाणून घ्या त्या 10 शुभ वस्तूंबद्दल ज्यापैकी आपल्याला श्रावण महिन्याच्या प्रथम दिवशी खरेदी करणे शुभ ठरेल.
 
1. त्रिशूळ
महादेवाच्या हातात त्रिशूळ नेहमी असतं. हे 3 देव आणि 3 लोक याचे प्रतीक आहे. म्हणून श्रावणाच्या पहिल्या दिवशी चांदीचं त्रिशूळ खरेदी केल्याने वर्षभर संकटापासून रक्षा होते.
 
2. रुद्राक्ष 
सुख, सौभाग्य आणि समृद्धीसाठी तसेच मनाच्या पवित्रतेसाठी खरं रुद्राक्ष घरात आणावं किंवा घरात असलेल्या रुद्राक्षाला चांदीत सुशोभित करून घालावे. हे आपल्या जीवनासाठी अत्यंत शुभ आणि समृद्धिदायक ठरेल.
 
3. डमरू
हे महादेवाचं पवित्र वाद्य यंत्र आहे. याची पवित्र ध्वनी नकारात्मक शक्तींना दूर करते. आरोग्यासाठी देखील डमरूची ध्वनी प्रभावी असल्याचे मानले गेले आहे. श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी डमरू खरेदी करून आणावं आणि शेवटल्या दिवशी एखाद्या लहान मुलाला भेट म्हणून द्यावे.
 
4. नंदी 
नंदी महादेवाचे गण आणि वाहन आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदीचे नंदी घरात आणून महिनाभर पूजा करावी याने आर्थिक संकट दूर होतात.
 
5. जल पात्र 
पाणी महादेवाला अत्यंत प्रिय आहे. आपण श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी गंगाजल घरात आणून त्याची पूजा करावी. परंतू असे शक्य नसल्यास चांदी, तांबा किंवा पितळ्याचे पात्र आणून त्यात निर्मळ पाणी भरून महादेवाला अभिषेक करावं. असे केल्याने धन आगमन सुरळीत होतं.
 
6. सर्प
महादेवांच्या गळ्याभोवती सर्पराज असतात. म्हणून श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदीच्या नाग-नागिणीची जोडी घरात आणून ठेवावी. दररोज पूजन करून श्रावण महिन्याच्या शेवटल्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन ठेवून द्यावी. हा प्रयोग पितृ दोष आणि काल सर्प योग यात देखील दिलासा देतं.
 
7. भस्म 
महादेवाच्या मंदिरातून भस्म आणून नवीन चांदीच्या डबीत ठेवावी. महिनाभर पूजनात सामील करावी आणि नंतर तिजोरीत ठेवून द्यावी. याने घरात भरभराटी येते.
 
8. कडा 
महादेव पायात चांदीचा कडा घालतात. म्हणून श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदीचा कडा आणल्याने तीर्थ यात्रा आणि परदेश प्रवासाचे शुभ योग बनतात.
 
9. चांदीचा चंद्र किंवा मोती
महादेवांच्या मस्तकावर चंद्रमा विराजमान आहे. म्हणून श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदीचे चंद्र देव आणून पूजनात ठेवावे आणि शक्य असल्यास खरा मोती देखील आणू शकता. मोती चंद्र ग्रहाची शांती करतं. अशाने मन देखील मजबूत होतं. आपण चंद्र किंवा मोती या सोबत पेंडेट धारण करू शकतात. 
 
10. बेलपत्र 
श्रावणात महिनाभर महादेवाला बेल पत्र अर्पित केले जातात. परंतू काही वेळा शुद्ध अखंडित बेल पत्र मिळणे शक्य नसतं. अशात चांदीचं बेल पत्र आणून दररोज महादेवाला अर्पित केल्याने अनेक पापांपासून मुक्ती मिळते आणि घरात शुभ कार्यांचे योग जुळून येतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वारी पंढरीची: गोंदवले ते पंढरपूर