Whatsapp ने आपल्या इंस्टेंट मेसेजिंग अॅप प्रायव्हसी पॉलिसीत बदल केल्यामुळे सर्वींकडे गोंधळ उडाला आहे. लवकरच वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅपची नवीन पॉलिसी स्वीकाराली नाही तर खाते रद्द करण्यात येतील. आता यूर्जस खाजगी गोष्टींत ढवळाढवळ होणार यावर नाराज असून व्हॉट्सअॅपविना काम कसे चालेल यामुळे हैराण देखील आहे. पण काळजी करण्याची गरज नाही कारण व्हॉट्सअॅपची पॉलिसी पटत नसेल तर दुसरे पर्याय देखील आहेत-
Telegram
टेलिग्राम वेळोवेळी व्हॉट्सअॅपची खिल्ली उडवत असतो. हे एक क्लाउड आधारित मेसेजिंग अॅप असून यात मेसेजिंग आणि व्हाइस कॉल्ससाठी एंड टू एड एनक्रिप्शन उपलब्ध आहे. टेलिग्रामने १.५ जीबी पर्यंत फाइल्स पाठवता येतात. विशेष म्हणजे एका ग्रुपमध्ये २ लाख युजर्सपर्यंत जोडता येऊ शकतात. हे अँड्रॉयड, आयओएस, विंडोज, विंडोज एनटी, मॅक ओएस आणि लिनक्स सॉफ्टवेअरवर काम करते.
Viber
वायबर अॅप मेसेज आणि व्हाइस कॉल्ससाठी एंड टू एन्ड एनक्रिप्शन उपलब्ध करते. वायबर अॅपची चॅट्स सुद्धा गुगल ड्राइव्ह वर घेता येवू शकते. येथे आपण आपली चॅट्स स्टोअर करु शकता. कंपनीनुसार नवीन व्हर्जन अत्यंत सुरक्षित आहे.
Element
इलेमेंट अॅप एंड टू एंड एनस्क्रिप्शन उपलब्ध करते. यात आधुनिक कम्यूनिकेशन टूल्स दिले गेले आहेत. याच्या मदतीने फाइल्स सहज शेअर करता येतात. व्हिडिओ चॅट करताना स्क्रीन शेअर करता येते. हे अॅप अँड्रॉयड, आयओएस, विंडोज, मॅक ओएस आणि लिनक्स सॉफ्टवेयरवर काम करते.
Signal
सिग्नल अॅपने व्हॉट्सअॅपला भारतात अॅप स्टोअरवर टॉप फ्री अॅप्सच्या यादीत मागे टाकत आहे. हे अॅप अँड्रॉयड, आयओएस, विंडोज, मॅक ओएस आणि लिनक्स
सॉफ्टवेयरसह आयपॅडवर देखील काम करते.