आयआयटीच्या ईशान नाडकर्णी आणि निखिल खंडेलवाल यांनी बनवलेल्या अॅपच्या माध्यमातून तुमच्या चालण्याने गरजवंतांना 10 रुपयांची मदत मिळू लागली आहे. यात हे अॅप 1 लाख जणांनी डाऊनलोडही केले आहे. यामध्ये भारतातील 95 हजार तर परदेशातील 5 हजार युजर्सनी डाऊनलोड केले आहे. या अॅपला आरती इंडस्ट्रीज, हीरो मोटोकॉर्प, वेलस्पन, एसबीआय, डीएचएल आणि हिमालया सारख्या कंपन्या सीएसआर फंडातून मदत पुरवतात. सीएसआर फंडातून पैसे सामाजिक संस्थांना वळते केले जातात. ही रक्कम कोणत्या संस्थेला द्यायची याची निवड युजर करू शकतो. आतापर्यंत या अॅपवरून गरजवंतांना 4 कोटींची मदत देण्यात आली असून यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी, शहीद जवानांचे कुटुंब, मुंबईतील झोपड्यामध्ये राहणाऱ्या महिला आणि जळगावमध्ये 11250 रोपट्यांचे रोपण करण्यात आले आहे.
दर 1 किमी चालणे किंवा धावल्यावर सामाजिक संस्थांना सीएसआर फंडांतून 10 रुपये दिले जाणार आहेत. यासाठी केवळ हे अॅप इन्स्टॉल करून आपले वय आणि वजन टाकावे लागणार आहे. यानंतर हे अॅप चालतेवेळी सुरु करावे लागते.