Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Jio GigaFiber ची वाट लवकरच संपणार आहे

Jio GigaFiber ची वाट लवकरच संपणार आहे
, शुक्रवार, 15 मार्च 2019 (14:21 IST)
आता लवकरच आपल्याला ब्रॉडबँड सेवेचे आतापर्यंतचे सर्वात स्वस्त प्लान्स मिळणार आहे. Jio GigaFiber लवकरच रोलआउट केला जाऊ शकतो. रिलायन्स जिओ यासाठी आधीच घोषणा करून चुकले आहे. ब्रॉडबँड सेवेमध्ये चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी जिओने डेन नेटवर्क्स, हॅथवे केबल आणि डेटाकॉमसह भागीदारी केली आहे.
 
एका अहवालानुसार रिलायन्स जिओने डेन नेटवर्क्सचा इतर भाग देखील विकत घेतला आहे, ज्यामुळे कंपनीवर अधिक नियंत्रण करता येईल. अहवालानुसार रिलायन्स जियो जवळ आधीच डीएन नेटवर्कमध्ये 66.57 टक्के भागीदारी आहे. आता कंपनीने 5.17 कोटी अधिक शेअर्स खरेदी केले आहे. यासह, मल्टी सिस्टम ऑपरेटर
(एमएसओ) डेन नेटवर्कचा त्यांचा वाटा 78.62 टक्केपर्यंत वाढला आहे.

रिलायन्स जिओने गेल्या वर्षी जाहीर केले होते की डेनमध्ये त्याचा 66 टक्के भागदारी आहे. हॅथवेमध्ये जिओचा शेअर 51.3 टक्के आहे आणि या दोन्ही कंपन्या भारतातील सर्वात मोठ्या लोकल केबल ऑपरेटर (एलसीओ) आहे. Jio GigaFiber या गोष्टीमुळे देखील चर्चेत आहे की त्याच्या आगमनानंतर लोकल केबल ऑपरेटर्सनाही स्पर्धा मिळणार आहे, कारण ते एफटीटीएचसमोर उभे राहण्यास सक्षम नसेल. तथापि आता, नवीन भागीदारी पाहून, असे वाटत आहे की जिओ फायबर ब्रॉडबँड सेवेत मोठा बदल आणू शकतो. GigaFiber च्या अपेक्षित योजनेबद्दल बोलू तर हे कनेक्शन कॉम्प्लिमेंट्री ऑफरसह येईल. यात ग्राहकांना पहिल्या तीन महिन्यांसाठी 100 जीबी डेटा100 एमबीपीएसच्या गतिने मिळेल. सब्सक्राइबर्सला कनेक्शन घेण्यासाठी 4500 रुपयाचे रिफंडेबल डिपाजिट करावे लागतील. कंपनीकडून कोणतेही इन्स्टॉलेशन शुल्क घेतले जाणार नाही.
 
* 29 शहरांमध्ये सुरु होऊ शकते ही सेवा - एका ऑनलाइन अहवालानुसार Jio GigaFiber लॉन्च होणारी पहिल्या शहरांमध्ये बंगलोर, चेन्नई, पुणे, लखनऊ, कानपूर, रायपूर, नागपूर, इंदौर, ठाणे, भोपाळ, गाजियाबाद, लुधियाना, कोयंबटूर, आगरा, मदुरई, नाशिक, फरीदाबाद, मेरठ, राजकोट, श्रीनगर, अमृतसर, पटना, इलाहाबाद, रांची, जोधपूर, कोटा, गुवाहाटी, चंदीगड आणि सोलापूर हे सामिल आहे.
 
* Jio GigaFiber म्हणजे काय? - हे फिक्सड लाइन ब्रॉडबँड कनेक्शन आहे. जिओ गिगा फायबर ब्रॉडबँड एका सेट टॉप बॉक्समध्ये येईल. हे टीव्हीला व्हॉईस कमांडद्वारे ऑपरेट करण्यास मदत करेल. तसेच इंटरनेट देखील चालवेल. एक टीव्ही कॉलिंग फीचर देखील असेल. या अंतर्गत, 4K व्हिडिओ, स्मार्ट होम आणि ऑनलाइन गेमिंगसारखी सेवा सुलभ होईल आणि त्यात कोणताही अडथळा येणार नाही. Jio GigaFiber द्वारे 1 जीबीपीएस
पर्यंतची अधिकतम स्पीड मिळू शकेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोशल मीडियावर हे 'मिम' होतय व्हायरल