Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एअरटेल विमानप्रवासात इंटरनेट, कॉलिंग सेवा देणार

एअरटेल विमानप्रवासात इंटरनेट, कॉलिंग सेवा देणार
, शुक्रवार, 15 मार्च 2019 (10:16 IST)
नेहमीच विमानप्रवासादरम्यान आपल्याला मोबाईल फ्लाईट मोडवर टाकावा लागतो. त्यामुळे विमानप्रवासा दरम्यान आपल्याला कोणालाही कॉल किंवा इंटरनेट सेवा वापरता येत नाही. यामुळे प्रवासादरम्यान गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवासादरम्यान इंटरनेट आणि कॉलिंग सेवा एअरटेल टेलिकॉम कंपनी  युजर्ससाठी सुरु करणार आहे. यासाठी कंपनीने सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.
 
गेल्या महिन्यात ह्यूजस कम्युनिकेशन इंडियाने देशातील या प्रकारचा परवाना मिळवणारी पहिली कंपनी असण्याचा मान मिळवला आहे. तसेच नाल्को या कंपनीच्या मालकीची असलेल्या सहकारी कंपनी टाटानेज सर्विसेजने ६ मार्चला हा परवाना मिळणार असल्याची घोषणा केली. सरकारने आयएफएमसीने एकदा का परवाना दिला की, विमानातून प्रवास करणाऱ्या एअरटेल युझर्सना प्रवासादरम्यान व्हॉईस कॉलिंग आणि इंटरनेटचा वापर करता येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

न्यूझीलंडच्या मशीदीत झालेल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, थोडक्यात बचावली बांगलादेशाची टीम