Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिओने नवीन 'OTT स्ट्रीमिंग प्लॅन' लाँच केला, 888 रुपयांमध्ये 15 OTT ॲप्स उपलब्ध

जिओने नवीन 'OTT स्ट्रीमिंग प्लॅन' लाँच केला, 888 रुपयांमध्ये 15 OTT ॲप्स उपलब्ध
, शुक्रवार, 10 मे 2024 (20:02 IST)
• फायबर आणि एअरफायबरचे ग्राहक लाभ घेऊ शकतील
• 15 OTT ॲप्समध्ये Netflix, Amazon Prime आणि JioCinema सारख्या प्रीमियम ॲप्सचा समावेश आहे
• तुम्हाला अमर्यादित डेटासह 30 Mbps चा वेग मिळेल.
• Jio IPL DDD ऑफर लागू (50 दिवस अतिरिक्त)
 
रिलायन्स जिओने स्ट्रीमिंग प्रेमींसाठी नवीन पोस्टपेड OTT बंडल योजना आणली आहे. या प्लॅनसह, ग्राहकांना केवळ 15 प्रीमियम ओटीटी ॲप्स सोबतअमर्यादित डेटा देखील मिळतो ज्यामुळे ते त्यांच्या आवडत्या ॲप्सवर कार्यक्रम पाहू शकतात आणि त्यांना पाहिजे तितका वेळ पाहू शकतात. हा प्लॅन दरमहा रु 888 च्या परवडणाऱ्या किमतीत येतो आणि प्लॅन जियो फायबर आणि जियो एयरफायबर या दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
 
नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 Mbps चा स्पीड मिळेल. याव्यतिरिक्त, नेटफ्लिक्स चे मूलभूत प्लॅन, अमेज़न प्राइम  आणि जिओ सिनेमा प्रिमियम सारख्या 15 हून अधिक आघाडीच्या OTT ॲप्स प्लॅनसह एकत्रित आहेत. म्हणजेच या ॲप्सचे सबस्क्रिप्शन प्लॅनसह उपलब्ध असणार. या प्लॅनची ​​आणखी एक खास गोष्ट म्हणजे, 10 Mbps किंवा 30 Mbps प्लॅन वापरणारा नवीन सदस्य असो किंवा विद्यमान वापरकर्ता असो, ₹ 888 चा पोस्टपेड प्लॅन प्रत्येकासाठी आहे. प्रीपेड प्लॅन असलेले सर्व विद्यमान वापरकर्ते नवीन पोस्टपेड प्लॅनमध्ये सहजपणे अपग्रेड करू शकतात.
 
याशिवाय, नुकतीच जाहीर केलेली Jio IPL धना धना धन ऑफर देखील या प्लॅनवर लागू होईल.जिओ फायबर असो किंवा एअर फायबरचे पात्र ग्राहक त्यांच्या जिओ  होम ब्रॉडबँड कनेक्शनवर 50-दिवसांच्या डिस्काउंट क्रेडिट व्हाउचरचा लाभ घेऊ शकतात.हा प्लॅन 31 मे 2024 पर्यंत उपलब्ध, Jio DVD ऑफर खास T20 सीझनसाठी तयार करण्यात आला आहे.

Edited By- Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

T20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक बदलणार! द्रविडचा करार जूनमध्ये सह संपुष्टात येणार