Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोबाईलवरुन स्वतःचे पेटीएम खाते कसे बनवायचे जाणून घ्या

मोबाईलवरुन स्वतःचे पेटीएम खाते कसे बनवायचे जाणून घ्या
, गुरूवार, 4 मार्च 2021 (20:40 IST)
आजकाल पेटीएम मोबाईल वॉलेट खूप लोकप्रिय आहे. पेटीएमवर लाखो लोक अकाउंट बनवून त्याचा उपयोग करत आहे आणि घरात बसूनच पाणी,गॅस,विजेचे बिल टेलिफोन बिल, आरक्षण करत आहे. आपल्याला देखील पेटीएम मोबाईल वॉलेट बनवायचे आहे.तर सांगत आहोत काही सोप्या स्टेप्स ज्यांना अवलंबवून आपण देखील पेटीएम मोबाईल वॉलेट बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
 
* पेटीएम डाउनलोड करा-
सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मधून पेटीएम अ‍ॅप डाउनलोड करा.जर आपल्या मोबाईल मध्ये पेटीएम अ‍ॅप आहे तर डाउनलोड करण्याची गरज नाही आणि नसेल तर हे डाउनलोड करू शकता.  
 
* पेटीएम उघडा-
पेटीएम डाउनलोड केल्यावर होम स्क्रीन वरून क्लिक करून पेटीएम उघडा. 
 
* लॉगिनवर क्लिक करा- 
पेटीएम उघडल्यावर वरील बाजूस असलेले पेटीएम वर लॉगिन वर Login To Paytm! क्लिक करा. 
 
* नवीन खाते तयार करा- 
लॉगिन टॅप केल्यावर स्क्रीन उघडेल यामध्ये दोन पर्याय दिसतील खालील बाजूस असलेले  “Create a New Account” वर क्लिक करा.
 
* मोबाईल नंबर लिहा- 
या नंतर ज्या नंबर वर पेटीएम अकाउंट बनवायचे आहे तो अधिकृत मोबाईल नंबर लिहा. हे नंबर वेरिफाई केले जाईल. म्हणून जो नंबर सुरू आहे तो मोबाईल नंबर लिहावे. या मध्ये मेसेज पाठविण्याची सुविधा देखील असावी.जेणे करून ओटीपी आल्यावर ते टाकता येईल. नंबर प्रविष्ट केल्यावर  “Proceed Securely” ला टॅप करून पुढे वाढा.
 
* ओटीपी प्रविष्ट करा- 
Proceed Securely वर क्लिक करतातच पेटीएम अकॉउंट बनेल. नंतर पेटीएम एक ओटीपी One Time Password आपल्या अधिकृत मोबाईलवर पाठवेल. हे ओटीपी प्रविष्ट केल्यावर Done वर क्लिक करा. 
 
* इतर तपशील द्या- 
ओटीपी  टाकल्यावर पेटीएम काही माहिती मागतो. या मध्ये नाव,संपूर्ण नाव,जन्मतारीख, लिंग भरावे लागते. ही माहिती दिल्यावर  Confirm बटण वर क्लिक करा.  
 
* पेटीएम वापरा-
आपले पेटीएम खाते उघडले गेले आणि आपण पेटीएमचा वापर करण्यासाठी सज्ज आहात. 
 
* केवायसी पूर्ण करा .

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अर्थसंकल्पीय अधिवेशन: जळगाव प्रकरणात तथ्य नाही- अनिल देशमुख