Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लवकरच मोबाईलच्या मदतीने काढा तिकीट

लवकरच मोबाईलच्या मदतीने काढा तिकीट
, शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (15:44 IST)

मुंबईकरांना लवकरच मोबाईलच्या मदतीने लोकलचं तिकीट काढता येणार आहे. यासाठी रेल्वेने ' UTS हे अॅप तयार केलं आहे. देशातील इतर शहरांमध्येही ही सेवा सुरू केली जाणार आहे, पण याची सुरूवात मुंबईतून होत आहे.

मोबाइलमध्ये UTS मोबाइल अॅप डाउनलोड करून तिकीट बूक केल्यानंतर एक  क्यूआर कोड मिळेल. बूकिंग झाल्यानंतर स्थानकावर पोहोचून त्याचं प्रिंटआउट घ्यावं लागेल. प्रिंटआउट घेण्यासाठी रेल्वे स्थानकांवर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन (OCR) मशीन लावण्यात येणार आहे. या मशिनवर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्रिटआउट मिळेल.  OCR मशिन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, चर्चगेट, दादर, बांद्रा, अंधेरी आणि बोरिवली याठिकाणी लावण्यात येणार आहे.  सध्या केवळ चाचणी घेण्यासाठी या मिशिन लावल्या जात आहेत, प्रयोग यशस्वी ठरल्यास इतर स्थानकांवर या मशिन लावल्या जातील. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘मी निवृत्त होणार आहे' : सोनिया गांधी