Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Paytm ने लाँच केला All-in-One QR code

Paytm ने लाँच केला All-in-One QR code
, गुरूवार, 9 जानेवारी 2020 (13:11 IST)
मोबाइल वॉलेट अ‍ॅप Paytm ने देशभरातील व्यापाऱ्यांसाठी युनिफाइड ‘All-in-One QR’ कोड सादर करण्याची घोषणा केली आहे. या QRमुळे आता व्यावसायिकांना Paytm Wallet, Rupay Cards आणि UPI आधारित सर्व पेमेंट्स ॲपच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यात निःशुल्क स्वीकारता येईल. पेमेंटची कोणतीही मर्यादा नसेल. 
 
याशिवाय कंपनीने ‘Paytm for Business’ ही सेवाही सुरू केली आहे. याने पेटीएमच्या व्यावसायिक भागीदारांना त्यांच्या ग्राहकांशी केलेल्या रोख तसेच उधारीच्या सर्व व्यवहारांच्या डिजिटल खातेवहीचे व्यवस्थापन करता येईल. ‘Paytm for Business’ द्वारे व्यावसायिक पत व्यवहारासाठी देय तारीख ठरवू शकतात आणि रिमाइंडर पाठवू शकतात. ग्राहकांना त्यांच्या व्यवहारांच्या आधीच्या सर्व माहितीसह सूचना प्राप्त होईल तसेच त्यांना त्याच लिंकमार्फत ते पैसेही भरता येतील.
 
कंपनीने सर्वसमावेशक Paytm QR चे कॅल्क्युलेटर, पॉवर बँक, घड्याळ, पेन स्टँड आणि रेडिओसारख्या विविध वस्तूंमध्ये सादरीकरण केले आहे. व्यावसायिक कंपनीने ‘Paytm for Business’ या ॲपच्या माध्यमातून सर्व पेमेंट्ससाठी एकच विवरणची सुविधाही उपलब्ध केली आहे. 
 
पेटीएमने व्यावसायिकांचे नाव, लोगोज आणि चित्रांसह वैयक्तिककृत क्यूआर कोडचे अनावरण केले. या क्यूआर कोड्सच्या घरपोच सेवा ‘पेटीएम फॉर बिझिनेस‘ ॲपवरील मर्चेंडाइज स्टोअरद्वारे मिळेल.
 
‘Paytm for Business’ ॲप पेटीएमचे 10 दशलक्षहून अधिक व्यापारी मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बायकोने केली शरीरसुखाची मागणी, नवर्‍याने केली जबर मारहाण