ई-वॉलेट कंपनी असलेल्या पेटीएमनं आता डिजिटल ट्रान्झॅक्शनवर कोणतंही अतिरिक्त चार्ज द्यावं लागणार नाही. याआधी मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितलं होतं की, क्रेडिट कार्डाच्या व्यवहारावर 1 टक्के, डेबिट कार्डाच्या व्यवहारावर 0.9 टक्के आणि नेट बँकिंग आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या ट्रॉन्झॅक्शनवर 12 ते 15 टक्क्यांचं शुल्क ग्राहकांना भरावं लागणार आहे. त्यानंतर कंपनीनं स्पष्टीकरण देत अशी कोणतीही योजना नसल्याचं सांगितलं आहे.
मीडियामध्ये सुरू असलेल्या वृत्ताचं पेटीएमनं पूर्णतः खंडन केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं 2 हजार रुपयांपर्यंतच्या ऑनलाइन व्यवहारावरचे चार्जेस स्वतः देणार असल्याचं सांगितलं होतं.