Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परत वाढल्या PUBG गेमच्या समस्या

परत वाढल्या PUBG गेमच्या समस्या
, शनिवार, 20 एप्रिल 2019 (17:37 IST)
ज्या प्रकारे चिनी अॅपमुळे भारतातील लोकांवर वाईट परिणाम होत आहे. ते पाहताना नुकतेच व्हिडिओ शेअरिंग अॅप TikTok ला Google आणि Apple ने आपल्या अॅप स्टोअर वरून प्रतिबंधित केलं आहे. त्यानंतर आता राजकोट पोलिसने PUBG Mobile च्या डाऊनलोडावर देखील बंदी घालण्याची मागणी केली आहे त्यामुळे राजकोटमध्ये हा गेम प्रतिबंधित करता येईल. यासाठी राजकोट पोलिसाने Google ला एक पत्रही लिहिले आहे त्या मध्ये Google Play Store वरून PUBG Mobile च्या डाऊनलोडावर बंदी घालण्याची गोष्ट लिहिली आहे. 
 
* राजकोट पोलिसांनी काय सांगितले ते जाणून घ्या - राजकोट पोलिसांना Google ला पाठवलेल्या पत्राचं सध्या तरी काहीच उत्तर नाही मिळालं आहे. यावर राजकोट पोलिसांनी असे म्हटले आहे की आम्ही PUBG गेमवर बंदी घातली आहे आणि शक्य असल्यास क्षेत्राच्या आयपी पत्त्याद्वारे राजकोटमध्ये PUBG डाऊनलोडावर देखील बंदी घाला. राजकोटमध्ये हा गेम खेळताना कोणी पाहिल्यास त्याला अटक केली जात आहे.
 
* राजकोटमध्ये PUBG गेमवर बंदी घालण्याचे कारण - राजकोट पोलीसच्या मते PUBG गेम खेळण्याने लोकांवर वाईट प्रभाव पडत आहे. इतकेच नव्हे तर अगदी लहान मुलं देखील या गेमसाठी वेडे होत आहे. त्यांना या गेमचे असे व्यसन लागले आहे की मुलांचे पालक देखील त्यांच्यामुळे खूप त्रासवले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिलायन्स जिओचा 3 हजार कोटींचा नफा, फक्त अडीच वर्षांत 30 कोटी ग्राहकांची संख्या ओलांडली