Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 11 April 2025
webdunia

मुकेश अंबानी यांचा कॉंग्रेसच्या या उमेदवाराला जाहीर पाठींबा केला प्रचार

mukesh anbani
, गुरूवार, 18 एप्रिल 2019 (17:20 IST)
देशातील सर्वात मोठा उद्योग समूह आणि देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती रिलायन्सचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पहिल्यांदाच काँग्रेसचा जाहीर प्रचार केला असून, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा दिलाय. याबाबत मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला असून, मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठी योग्य उमेदवार असल्याचे सांगितले आहे. देवरा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. त्यांना भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आणि विद्यामान खासदार अरविंद सावंत यांचे प्रमुख आव्हान आहे. देवरा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत अंबानी म्हणतात, ‘मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठीचे योग्य उमेदवार आहेत. त्यांनी दक्षिण मुंबईचे 10 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. मिलिंद यांना सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेचे सखोल ज्ञान आहे.’ विशेष म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी स्वतः खूप कमी वेळा राजकीय भाष्य केले असून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अंबानींनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा होता आता मात्र त्यांनी कॉंग्रेसच्या  देवरा यांना पाठिंबा दिल्याने जोरदार राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

JIO चे नवीन धमाल, आता मिळेल ही मोठी सुविधा