Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pulwama Attack : वेगाने व्हायरल होत आहे हा फोटो, शेवटी काय आहे याचे रहस्य ?

Pulwama Attack : वेगाने व्हायरल होत आहे हा फोटो, शेवटी काय आहे याचे रहस्य ?
, मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (14:17 IST)
पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशात लोकांमध्ये द्वेष आणि बदल्याची आग भडकली आहे. लोक रस्त्यावर निघून पाकिस्तानविरुद्ध प्रदर्शन करत असून सोशल मीडियावर देखील भारतीय सेनेला आपला पाठिंबा देत आहे. भारतीय सेनेला सपोर्ट करण्यासाठी Whatsapp वर लोक आपले डीपी बदलून हा फोटो लावत आहेत. असे म्हटले जात आहे की हे ब्लॅक बॅच लोगो आहे. त्यात एक काळा रिबन आहे. पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी रोजी 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते, म्हणून त्यांना लक्षात ठेवताना आणि पाकिस्तानच्या विरोधात हा फोटो लावण्यात येत आहे. 
 
हा फोटो फक्त व्हाट्सएपवरच नाही तर ट्विटर आणि फेसबुकवर देखील प्रोफाइल पिक बनत आहे. परंतु येथे स्पष्ट करणे आवश्यक आहे की हा फोटो भारतीय सैन्याच्या कोणत्याही भागाचे चिन्ह नाही, तरी हे कोणालाही ठाऊक नाही की हा फोटो कुठून आणि कसा व्हायरल होत आहे? काळा रिबन शोक प्रतीक म्हणून वापरला जातो. एखाद्याबद्दल श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. गूगलने भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना आपल्या होमपेजवर काळा रिबन लावून श्रद्धांजली दिली होती.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIC पॉलिसी असेल तर लवकर करा हे काम, नाही तर अडकू शकतो पैसा...