Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 25 April 2025
webdunia

व्हॉटसअॅप डिलिट केलेला मेसेज असा वाचा

Read Whatsapp Deleted Message
, बुधवार, 12 डिसेंबर 2018 (09:06 IST)
व्हॉटसअॅप डिलिट केलेला मेसेज वाचायचा असेल तर फार काही कष्ट करण्याची गरज नाही. कारण डिलिट केलेले मेसेज अँड्राईड सिस्टिमच्या 'नोटिफिकेशन रजिस्टर'मध्ये स्टोअर केले जातात. डिलिट केलेले मेसेज जर तुम्हाला पाहायचे असतील, तर तुम्हाला प्ले स्टोअरवरुन 'नोटिफिकेशन हिस्ट्री' हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. अॅप इन्स्टॉल केल्यानंतर या अॅपमध्ये व्हॉटसअॅपवर आलेले मेसेज वाचण्याची परवानगी द्यावी लागेल. फोटो आणि मीडिया अॅक्सेस द्यावे लागेल. यानंतर नोटिफिकेशन हिस्ट्री सेटिंगमधून व्हॉट्सअॅप नोटिफिकेशनला परवानगी द्यावी लागेल. या अॅपच्या मदतीने डिलिट केलेले मेसेज वाचता येऊ शकतात. यात फक्त व्हॉटस्अॅप नाही, तर मोबाईलवर येणारे हँगआऊट, एसएमएस आणि इतर नोटिफिकेशन्स पाहू शकतो. मोबाईल रिस्टार्ट केल्यानंतर डिलिट मेसेज वाचता येणार नाही. १०० अक्षरांनंतर मेसेज रिकव्हर करता येणार नाही. ही ट्रिक फक्त अँड्रॉईड युजर्ससाठीच आहे.
 
ही पद्धत वापरा
१. प्ले स्टोअरवरुन Notisave अॅप डाऊनलोड करुन, ऊघडा. 
२. हे अॅप सर्व नोटिफिकेशन रेकॉर्ड करते.
३. Notisave अॅप नोटिफिकेशन अॅक्सेससाठी परवानगी मागेल, यात तुमच्या हॅण्डसेटमधील फोटो आणि मीडियाला अॅक्सेस द्यावा लागेल.
४. युजर्सच्या समोर अनेक अॅप नोटिफिकेशनचे पर्याय दिसतील. त्यातून व्हॉटस्अॅप निवडायचं.
५. यानंतर Show On Status या पर्यायात व्हॉटसअॅप निवडा.
६. यानंतर सेटिंगमध्ये अॅप्लिकेशन एड डेट सुरु करा. यानंतर तुम्हाला डिलिट केलेले मेसेज पाहता येतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'राष्ट्रीय लोक समता पार्टी' एनडीएतून बाहेर