Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

निवडणुका निकाल : भाजपच्या अंतर्गत कलह सुरु

Election Result
, मंगळवार, 11 डिसेंबर 2018 (16:55 IST)
नुकत्याच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये झालेल्या भाजपाच्या निवडणुका पिछेहाटीनंतर भाजपामधूनच पक्षाच्या धोरणांविरोधात अंतर्गत कलह सुरु झाला आहे. तिन्ही राज्यांमध्ये भाजपा झालेल्या पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोलेल्या भाजापाला राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी घरचा अहेर दिलाय. विकासाचा मुद्दा विसरून राम मंदिर, पुतळे आणि नामांतराच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यानेच भाजपाला पराभव पत्करावा लागल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या कलांबाबत प्रतिक्रिया देताना भाजपाचे सहयोगी खासदार असलेले संजय काकडे म्हणाले की,  राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव होईल, हे माहीत होते. मात्र मध्य प्रदेशमधील निकाल धक्कादायक आहे. आमच्या पक्षाने  विकासाचा मुद्दा विसरून राम मंदिर, पुतळे आणि नामांतराच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यानेच भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Live updates : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरम 2018 विधानसभा निवडणुकीचे निकाल