आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. पटेल यांच्यावर दबाव आणून त्याना राजीनामा देण्यास भाग पाडल्याने सरकारची आता उलटी गिनती सुरु झाली आहे. तसेच विजय मल्ल्या याला ब्रिटनच्या न्यायालयाने भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिल्यावरही राज यांनी ताशेरे ओढले आहे. विजय मल्ल्या भारतात असतानाच कर्जाचे पैसे देण्यास तयार होता.त्याला फरारी घोषित केले गेले. त्यावर सवालही राज यांनी केला असून. दुसरा ट नीरव मोदीबद्दल सरकारने मिठाच्या गुळण्या केल्याचा होत्या का ? असे राज यांनी विचारले आहे. उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात मोठा धक्का मानला जातो आहे. उर्जित पटेल मोदी सरकारच्या दडपणाखाली काम करत असल्याची चर्चा होती.आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.