ट्विटरनं ट्विटची अक्षरमर्यादा वाढवून ती २८० अक्षरांची केली आहे. गेल्या वर्षी ट्विटरकडून ही अक्षरमर्यादा १४० पर्यंत वाढवण्यात आली होती, पण ती आणखी वाढवावी अशी ट्विपल्सनं मागणी केली होती. व्यक्त होण्यासाठी १४० अक्षरं खूपच कमी पडतात असं अनेकांचं म्हणणं होतं, त्यानुसार ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटकडून संदेशासाठीची अक्षरमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ट्विपल्स १४० ऐवजी २८० अक्षरांमध्ये ट्विट करू शकतात.
ट्विटरनं सप्टेंबर महिन्यात अक्षरमर्यादा वाढवण्याचा प्रयोग केला होता, हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शब्दमर्यादा वाढवण्यात आली आहे.इंग्रजी भाषेत ट्विट करणाऱ्यांसाठी २८० अक्षरांची मर्यादा असणार आहे. पण जे युजर्स चिनी,जपानी किंवा कोरियन भाषेत ट्विट करणार आहेत. त्यांच्यासाठी मात्र ही मर्यादा १४० अक्षरांचीच असणार आहे.