Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सावधगिरी बाळगा! व्हाट्सअॅपवर या 9 गोष्टी आपल्याला तुरुंगात पोहचवू शकतात

सावधगिरी बाळगा! व्हाट्सअॅपवर या 9 गोष्टी आपल्याला तुरुंगात पोहचवू शकतात
सरकारने गेल्या आठवड्यातच देशाच्या 10 मोठ्या सुरक्षा एजन्सींना आपल्या वैयक्तिक कम्प्युटरवर लक्ष ठेवण्याचा आदेश दिला आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण फोनवर काहीही करू शकता आणि हे सरकारद्वारे पाहिले जाणार नाही. वापरकर्त्यांचे संदेश वाचण्यासाठी सरकार आधीच व्हाट्सअॅपवर दबाव देत आहे. अशामध्ये हे देखील शक्य आहे की आपल्या एक संदेशामुळे आपल्याला तुरुंगात हवा खावी लागेल. तर चला आम्ही आपल्याला व्हाट्सअॅपबद्दल काही गोष्टी सांगू, ज्याबद्दल आपल्याला खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
 
1. ग्रुप चॅट - जर आपण एखाद्या व्हाट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन असाल, तर कोणत्याही आक्षेपार्ह संदेशाची तक्रार असल्यास पोलिस आपल्याला अटक करू शकते, मग तो संदेश ग्रुपच्या कोणत्याही सदस्याने पाठवलेला असो.
 
2. व्हाट्सअॅपवर वेश्याव्यवसाय किंवा वेश्याव्यवसायाची जाहिरात करणार्‍यांना किंवा यासंबंधी संदेशांवर आपल्यावर कारवाई होऊ शकते.
 
3. लोकप्रिय किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या फोटोंसह छेडछाड करून ते व्हाट्सअॅपवर शेअर करणे कायदेशीर गुन्हा आहे. 
 
4. महिला अपमान आणि त्यांच्या विरुद्ध हिंसा संबंधी संदेशांबद्दल देखील स्थानिक पोलीस आपल्याला अटक करू शकते.
 
5. जर आपण एखाद्या दुसर्‍या माणसाच्या नावाचे किंवा नंबरवरून व्हाट्सअॅप खाते चालवीत असाल तर आपल्याविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. म्हणून अशा गतिविधींपासून दूर राहावे.
 
6. द्वेष पसरवणारे संदेश - कोणत्याही धर्म किंवा कोणत्याही व्यक्तीबद्दल द्वेष पसरवणारे संदेशांसाठी देखील ग्रुप अॅडमिनला अटक होऊ शकते. तसेच, असे संदेश पाठविणारे लोकांना देखील पोलिस अटक करू शकते. 
 
7. खोट्या बातम्या - जर आपल्या व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवणार्‍या बातम्या शेअर होत असल्या, तर आपण त्वरित अशा मेसेज थांबवायला हवे किंवा संदेश पाठविणार्‍यांविरुद्ध तक्रार करायला हवी.
 
8. प्रतिबंधित वस्तूंची खरेदी आणि विक्री - आपण व्हाट्सअॅपद्वारे कोणत्याही प्रतिबंधित वस्तू किंवा ज्यांची खरेदी-विक्री करणे गुन्हा आहे अशा वस्तूंचा व्यवसाय करू शकत नाही.
 
9. कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याचा व्हिडिओ बनविणे आणि व्हाट्सअॅपवर शेअर करणे. त्याचवेळी, अश्लील व्हिडिओ शेअर करण्यासाठी देखील आपल्याविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'2019' च्या सुट्या