Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरेगाव भीमा परिसरात 11 ड्रोन तर जबरदस्त सुरक्षाव्यवस्था

कोरेगाव भीमा परिसरात 11 ड्रोन तर जबरदस्त सुरक्षाव्यवस्था
कोरेगाव भीमा हे राज्यात गाजणारे स्थळ आहे. तर कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ परिसरात 1 जानेवारी 2018 ला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.हे सर्व पाहता येत्या वर्षी 1 जानेवारी 2019 रोजी पोलीस आणि प्रशासनाच्या वतीने जबरदस्त बंदोबस्त ठेवला आहे. सोबतच कोरेगाव भीमा येथील चारही बाजूच्या आठ किलोमीटर परिसरावर 11 ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाणार आहे.  
 
पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही संपूर्ण माहिती दिलीय. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 ला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र  वर्षभर प्रत्येक महिन्यात ग्रामस्थांसोबत चर्चा केली असून, माध्यमातून त्यांच्यात एक विश्वास निर्माण करण्यात आणि भिती दूर करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत असे जिल्हाधिकारी स्पष्ट करत आहेत.यावेळी कोरेगाव भीमा येथे येणार्‍या नागरिकांची संख्या लक्षात घेता त्यादृष्टीने 300 पाण्याचे टँकर, 150 पीएमपीच्या बसेस आणि 11 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असणार आहे. तर १५ पट पोलीस असून सर्व परिसर आम्ही सुरक्षित करणार आहोत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निवडणुका लागल्या की, अनेक नेते भाजपा सोडणार- नवाब मलिक