महिला आणि तरुणींची छेड काढल्याप्रकरणी सदर आरोपीला शिक्षा देण्याची तरतूद कायद्यामध्ये जरी असली तरी मुलींचे छेड छेडाची प्रमाण काही कमी होत नाही. मुबंईच्या एका महिलने तिची छेड काढणाऱ्या तरूणाचा स्वत:च न्याय केला आहे.
महिलेने तिची सतत छेड काढणाऱ्या, तिला त्रास देणाऱ्या आणि तिच्याशी लज्जास्पद वर्तणूक करणाऱ्या तरूणाचं लिंग कापले आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून जोरदार चर्चा आहे. महिलेने तिच्या दोन मित्रांच्या साथीने छेडछाड करणाऱ्या तरूणाचं लिंग कापून टाकले आहे.
मंगळवारी रात्री मुंबई येथील डोंबिवलीमध्ये उघडकीस आली. डोंबिवलीच्या नांदिवली भागात राहणाऱ्या एका महिलेने तिची छेड काढणाऱ्याला धडा शिकवण्याच्या हेतूने हा कट रचला. तिने आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने रेल्वेरुळाशेजारी असलेल्या एका निर्जन स्थळी हे काम केलं. दरम्यान, या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये आणि विशेषत: नांदिवली परिसरात विविध चर्चांना सध्या उधाण आले आहे.
महिलेने इतके टोकाचे पाऊल उचलले यावरून तिला किती त्रास सहन करावा लागला असेल, पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपासा करत आहेत.