अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग, पोलिसांनी केले अटक

एका निर्लज्ज युवकाने दिव्यांग मुलीचा विनयभंग केल्याची घटना मुंबई येथे घडली आहे. दादर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे लोकलच्या दिव्यांग डब्यात एका १५ वर्षीय अंध मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. धक्कादायक प्रकार कल्याणला जाणाऱ्या लोकलमध्ये घडला. अल्पवयीन पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्यासोबत असलेल्या वडिलांना सांगितला आणि भामट्या विशाल सिंगला (वय २४) रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पॉक्सो कायद्यान्वये आरोपी विशाल सिंगला दादर रेल्वे पोलिसांनीअटक केली आहे. 
 
वृत्त असे की, १७ डिसेंबर रोजी ६ वी वर्गात शिकत असलेली १५ वर्षीय अंध मुलगी आपल्या वडिलांसोबत लोकलने दिव्यांग डब्यातून प्रवास करत होती.  दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आलेल्या कल्याण लोकलमध्ये त्यांच्या डब्यात एक तरुण चढला होता. या निर्लज्ज मुलाने  अंध मुलीला पाठीमागून अश्लील स्पर्श केला. त्यानंतर हे सहन न करता  पीडित मुलीने भामट्या तरुणाचे बोट पकडून घडलेला प्रकार वडिलांना सांगितला होता.  तिच्या वडिलांनी जाब विचारला , या युवकाने वाद घालण्यास सुरुवात केली. मुलीच्या वडिलांना त्याने धक्काबुक्की केली. त्यावेळी त्यास इतर प्रवाशांच्या मदतीने माटुंगा रेल्वे स्थानकावर उतरून ड्युटीवरील हजर असलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले.फिर्यादी वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आपल्या मुलीचा विनयभंग केल्याबाबत दादर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भा. दं. वि. कलम 354,(अ) सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा  2012 चे (पॉक्सो)  कलम 8, भारतीय रेल्वे कायदा  कलम 147, 155 (ब) या कायद्यांतर्गत आरोपी विशाल सिंगला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल हा मुलुंड येथे राहतो आणि तो विनातिकीट दिव्यांग नसून त्यांच्या डब्यातून प्रवास करत होता असल्याचं पोलीस तपासत निष्पन्न झालं आहे.  मुलीने धैर्य दाखवले म्हणून हा मुलगा पकडला गेला असून असे काही घडले तर पोलिसांनी लगेच कळवा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख लातूरला मिळाला अखेर परिवहन सभापती