Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोबाईल बँकिंग करत असाल तर काळजी घ्या, EventBot व्हायरसचा धोका

मोबाईल बँकिंग करत असाल तर काळजी घ्या, EventBot व्हायरसचा धोका
, शनिवार, 16 मे 2020 (11:09 IST)
भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद कार्यसंघ (CERT-In) ने नवीन सुचवले आहे की आपल्या खासगी डेटा चोरी करणाऱ्या 'इव्हेंटबॉट' नावाच्या मालवेयरने भारतातील अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांवर परिणाम होऊ शकतो. 
 
सीईआरटी-आयएन ने चेतावणी दिली आहे की हा ट्रोजन व्हायरस बेकायदेशीरपणे सॉफ्टवेयर डाउनलोड करणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट वर्ड, अडोबफ्लॅश आणि इतर सॉफ्टवेयरच्या रूपाने आपल्या फोनमध्ये शिरकाव शकतो. 
 
ट्रोजन हा एका प्रकाराचा व्हायरस किंवा मालवेयर असतो. जो नकळतच आपल्या कॉम्पुटर किंवा मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर हल्ला करतो. आणि वापरकरणाऱ्याला ह्याची माहितीच नसते. 
 
CERT-Inने सल्ला जाहीर केला आहे की इव्हेंटबॉट नावाचा एक नवीन अँड्रॉईड मोबाईल मालवेयर पसरत आहे. हा एक मोबाईल बँकिंग ट्रोजन आहे जो आपली सर्व माहितीला चोरत आहे.
 
 हा अँड्रॉईडच्या वित्तीय अ‍ॅप्स वरून वापरकर्त्यांची सर्व माहिती मिळवतो. त्याचे सर्व एसएमएस संदेश वाचतो. सीईआरटी-आईएन ही सायबर हल्ल्याशी लढणारी एक राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आहे. 
 
एडव्हायजरीमध्ये सांगितल्या प्रमाणे इव्हेंटबॉट 200 आपल्या वित्तीय अ‍ॅप्सला टार्गेट करू शकतो ज्यात बँकिंग अ‍ॅप्स, पैसे पाठविणारे अ‍ॅप्स सामील असतील. हे व्हायरस पेपाल बिझनेस, रेवोलुत, बार्कलेज, युनिक्रेडिट, कैपिटल वन यूके, एचएसबीसी यूके, ट्रांसफरवाइज, कॉइनबेस, पेसेफकार्ड या वर टार्गेट करु शकतो. 
 
एजन्सीने सांगितले आहे की इव्हेंटबॉट अद्याप गुगल प्लेस्टोरवर आला नाही पण तो कुठल्याही खऱ्या सॉफ्टवेअरचे रूप घेऊन आपल्या मोबाईल फोन मध्ये शिरकाव करू शकतो. 
 
सायबर सुरक्षा एजन्सीने देखील या व्हायरस पासून बचाव करण्याचे काही उपाय सांगितले आहेत. एडव्हायजरीनुसार अज्ञात आणि अविश्वसनीय स्रोतांकडून मोबाईलचे अ‍ॅप्स डाउनलोड करू नये.  अँटीव्हायरसचा वापर करा, आणि कुठल्याही सॉफ्टवेअरेला प्लेस्टोर वरून डाउनलोड करण्यापूर्वी त्याबद्दल खात्री करुन घ्यावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लॉकडाऊन 4.0: सोमवारी दिल्लीत मेट्रो आणि बस सेवा सुरू होऊ शकते