Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनमध्ये पर्यटक नजरकैदेत : फोनमध्ये जबरदस्ती केला जातोय मॅलवेअर

चीनमध्ये पर्यटक नजरकैदेत : फोनमध्ये जबरदस्ती केला जातोय मॅलवेअर
मुंबई , शुक्रवार, 5 जुलै 2019 (14:27 IST)
चीनमध्ये बाहेरच्या देशातून येणार्‍या पर्यटकांना नजरकैदेत ठेवण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. चीन या पर्यटकांना नजरकैदेत ठेवण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये जबरदस्तीने अँड्रॉइड मॅलवेअर इन्स्टॉल करत आहे. मॅलवेअरच्या मदतीने चीनसाठी यूजर्सच्या मोबाइलमधील मेसेज आणि अन्य फाइलही हाताळणे शक्य झाले आहे. चीनमध्ये होणार्‍या या जबरदस्तीला अनेक वृत्तपत्र आणि मीडिया हाउसने दुजोरा दिला आहे.
 
चीनच्या शिनजियांग शहरात येणार्‍या पर्यटकांना स्मार्टफोनमध्ये मॅलवेअर इन्स्टॉल करण्यास सांगितले जात आहे. तसेच, शिनजियांग शहरातून परतल्यानंतर तेथील सुरक्षा रक्षक पर्यटकांच्या मोबाइलमधील मॅलवेअर अनइन्स्टॉल करतात. अलीकडेच 'द गार्डिअन'च्या हाती एक स्मार्टफोन लागला असून, त्या फोनमध्ये हा मॅलवेअर इन्स्टॉल केलेला आढळून आला. यानंतर न्यूयॉर्क टाइम्स, व्हॉइस, आणि एका जर्मन ब्रॉडकास्टर एनडीआर या सर्वांनी मिळून मॅलवेअरच्या केलेल्या तपासणीत ही माहिती उघड झाली आहे.
 
सेलहंटर नाक हा मॅलवेअर यूजर्सच्या वैयक्तिक डेटा चोरीसहित स्मार्टफोनमधील अन्य फाइल्सही पूर्ण स्कॅन करतो. यात ईमेल, कॉन्टॅक्ट, मेसेज, फोन लॉग, कॅलेंडरसहित अन्य माहितीचाही सामावेश आहे. याबरोबर चिनी एजन्सीना फोनच्या लोकेशनबद्दलही संपूर्ण माहिती मॅलवेअर अ‍ॅपमार्फत मिळते.
 
माहिती गोळा करण्याबरोबर हा अ‍ॅप स्मार्टफोनमधील चीन सरकारच्या दृष्टीने संशयित असलेल्या 70 हजारहून अधिकफाइल्स स्कॅन करतो. यात एपी 3 फाइलसहित दहशतवादी संघटनांचे फोटो आणि व्हिडिओचाही सावेश आहे.
 
हा डेटा सीमेवरील कार्यालयाच्या लोकल सर्व्हरमध्ये स्टोअर केला जातो. मॅलवेअर अ‍ॅपच्या मदतीने चिनी पर्यटकांची हालचाल सुद्धा ट्रॅक केली जात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप याचे पुरावे मिळालेले नाहीत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदी 2.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प