Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉट्स अपला 21 कोटी रुपये दंड

व्हॉट्स अपला 21 कोटी रुपये दंड
रोम , सोमवार, 15 मे 2017 (14:44 IST)
आपल्या यूजर्सची खासगी माहिती त्यांचया परवानगीविना फेसबुकशी शेअर करणष व्हॉट्स अॅपला खूपच महागात पडले आहे. इटलीतील 'अँटीट्रस्ट अथॉरिटीज'ने व्हॉट्स अॅपला या फसवणुकीबद्दल 3 लशलक्ष युरो (सुमारे 21 कोटी रुपये) इतका दंड ठोठावला आहे. 
 
2014 मध्ये मार्क झुकरबर्गच्या फेसबुकने व्हॉट्स अॅप विकत घेतले होते. परंतु, व्हॉट्स अॅप यापुढेही स्वतंत्र कंपनी म्हणूनच काम करेल आणि त्यांच्या यूजर्सची माहिती त्यांच्याकडेच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु, 2016 मध्ये त्यांनी प्रायव्हसी पॉलिसी बदलली. यूजर्सच्या माहितीची देवाणघेवाण सुरू झाली. या 'डेटा शेअरिंग'ला संमत्ती न दिसल्यास यूजर्सना व्हॉट्स अॅपचा वापरच करता येत नव्हता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पनवेल येथे महिला पत्रकारांचे राष्ट्रीय संमेलन