Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉट्सअॅपमध्ये आणखीन दोन नवे फीचर्स

व्हॉट्सअॅपमध्ये आणखीन दोन नवे फीचर्स
, शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (17:10 IST)

व्हॉट्सअॅपने  आता अँड्रॉईड आणि आयओएस युझर्ससाठी दोन नवे फीचर्स आणले आहेत. पिक्चर टू पिक्चर आणि टेक्स्ट स्टेटस अशा दोन फीचर्सचा  समावेश करण्यात आला आहे.

पिक्चर टू पिक्चर फीचरमुळे व्हिडिओ कॉलिंग आणखी चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. व्हिडिओ कॉल चालू असताना विंडो छोटी करुन तुम्ही चॅटिंगही करु शकता. कंपनीने या फीचरची चाचणी सुरु केली आहे. या फीचरला PiP या नावाने ओळखतात. लवकरच हे फीचर सर्व युझर्ससाठी रोल आऊट होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या अपडेटमध्ये  व्हॉट्सअॅप युझर्सना टेक्स्ट स्टेटस शेअर करता येणार आहे. फेसबुक प्रमाणेच तुम्ही आता कलरफुल बॅकग्राऊंडमध्ये स्टेटस शेअर करु शकता. व्हॉट्सअॅपच्या ऑफिशिअल व्हर्जनमध्ये हे फीचर उपलब्ध आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जावेद हबीब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल