चायनाची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने आपलं नवीन फिटनेस बँड Mi Band 3i भारतात लॉन्च केले आहे. काळ्या रंगाच्या या बँडची किंमत 1,299 रुपये आहे. या फिटनेस ट्रॅकरला mi.com द्वारे प्री-ऑर्डर करता येईल.
Mi Band 3i चे फीचर्स
Mi Band 3i मध्ये 0.78 इंची एमोलेड टच स्क्रीन डिस्प्ले आहे. ही स्क्रीन अँटी-फिंगरप्रिंट कोटिंगसह येते.
Mi Band 3i मध्ये 110 mAh ची बॅटरी देण्यात आली असून याला फुल चार्ज होण्यासाठी अडीच तास लागतात. फुल चार्ज झाल्यावर बॅटरी 20 दिवसांचा बॅकअप देते. स्टॅप्स आणि कॅलरी ट्रॅक करण्याव्यतिरिक्त Mi Band 3i बँडवर नोटिफिकेशंस बघण्याची सुविधा देखील आहे.
हे फिटनेस बँड वॅदर फोरकास्टव्यतिरिक्त अलार्म आणि इव्हेंट रिमाइंडर फीचरसह येतं. फिटनेस बँडमध्ये स्लीप क्वॉलिटी मॉनिटर देखील देण्यात आले आहे. Mi Band 3i 5ATM पर्यंत (50 मीटर खोलीवर 10 मिनिटांसाठी) वॉटर रेजिस्टेंट आहे.
या व्यतिरिक्त हे फिटनेस बँड रनिंग, वॉकिंग, सायकलिंग आणि ट्रेडमिल अॅक्टिविटीज ट्रॅक करण्याची सुविधा देखील देतं.