आता सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर आपण इंटरनेट नसले तरी री-ट्विट करू शकता. ट्विटरचे नवीन राउंड टीम एक असे टूल आहे, जे यूजर ऑनलाईन नसल्यावरही अकाउंटने री-ट्विट करतो. यूजरला कोणत्या ट्विटला री-ट्विट करायचे आहे याचा निर्णय यूजरचा आहे. या टूलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इंटरनेटची गरज नाही.
कसे कराल
यासाठी राउंड टीम डॉट सीओ वर जा आणि या वेबसाइटच्या उजवीकडे ट्विटसह अकाउंटला रजिस्टर करण्याचा ऑप्शन असेल तिथे रजिस्टर करा. नवीन पान उघडल्यावर ट्विटर अकाउंट लॉन इन करा. येथे फॉलोअर्स आणि लिस्टसह 5 ऑप्शन्स दिले असतील. री-ट्विट करण्यासाठी फॉलोड ऑप्शनपुढे दिलेल्या प्लसच्या साइनवर क्लिक करा.
कोणत्याही हॅशटॅगमध्ये येणार्या ट्विटला री-ट्विट करण्यासाठी हॅशटॅगही सबमिट करू शकता. प्रत्येक तासाला एखाद्या विशेष कीवर्ड किंवा ट्विटर अकाउंटच्या किती ट्विटला री-ट्विट करायचे हे ठरवू शकता. यासाठी कोणत्याही यूजरचा हँडल किंवा हॅशटॅग सामील करा. मग उघडलेल्या बॉक्समध्ये ठरवून घ्या की त्या हॅशटॅग किंवा ट्विटरच्या अकाउंटचे किती ट्विट एका तासात री-ट्विट करायचे आहे.