Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असे झाले होते श्रीकृष्ण-बलरामाचे नामकरण संस्कार

असे झाले होते श्रीकृष्ण-बलरामाचे नामकरण संस्कार
वासुदेवाच्या प्रार्थनेवर यदुंचे पुरोहित महातपस्वी गर्गाचार्यजी ब्रज पोहोचले. त्यांना बघून नंद अत्यधिक प्रसन्न झाले. त्यांनी हात जोडून प्रमाण केले आणि विष्णुतुल्य मानून त्यांची पूजा केली. त्यानंतर नंदने त्यांना म्हटले की तुम्ही माझ्या दोघा मुलांचे नामकरण संस्कार करून द्या.  

पण गर्गाचार्यजी यांनी म्हटले की असे करण्यात बर्‍याच अडचणी आहेत. मी यदुवंशिंचा पुरोहित आहे जर मी या पुत्रांचे नामकरण संस्कार केले तर लोक यांना देवकीचे पुत्र मानतील कारण कंस तर पापमय बुद्धी आहे. तो सर्वदा निरर्थक गोष्टींचा विचार करतो. दुसरीकडे तुझी आणि वासुदेवाची मैत्री आहे.  
 
आता मुख्य गोष्ट म्हणजे की देवकीची आठवी संतानं मुलगी नाही असू शकत कारण योगमायेत कंसाने हेच म्हटले होते की - अरे पापी माला मारून काय फायदा आहे? तो नेहमी हाच विचार करायचा की मला मारणारा अवश्य जगात आला आहे. जर मी नामकरण संस्कार करवून दिले तर मला पूर्ण खात्री आहे की तो मुलांना मारून देईल आणि सर्वांचे अनिष्ट होईल.  
 
नंदने गर्गाचार्यजींना म्हटले की जर अशी बाब आहे तर एखाद्या एकांत जागेवर जाऊन स्वस्त्ययनपूर्वक यांचे द्विजाति संस्कार करवून द्या. याबद्दल माझ्या माणसांना देखील कळणार नाही. नंदच्या या गोष्टींना ऐकून गर्गाचार्याने एकांतात मुलांचे नामकरण करवून दिले. नामकरण करणे तर अभीष्टच होते, म्हणून ते आले होते.
webdunia
गर्गाचार्यजी यांनी वासुदेवाला म्हटले की रोहिणीचा हा पुत्र गुणांमुळे लोकांना प्रसन्न करेल. म्हणून याचे नाव राम असेल. याच नावाने हा ओळखला जाईल. यात बलाची अधिकता असेल. म्हणून लोक याला बल देखील म्हणतील. यदुवंशिंची आपसातील भांडण संपवून त्यांच्यात एकता स्थापित करेल, म्हणून लोक याला संकर्षण देखील म्हणतील. म्हणून याचे नाव बलराम असेल.  
 
आता त्यांनी यशोदा आणि नंद यांना सांगितले की हा तुमचा दुसरा पुत्र प्रत्येक युगात अवतार ग्रहण करत राहतो. कधी याचा वर्ण श्वेत, कधी लाल, कधी पिवळा असतो. आधीच्या प्रत्येक युगात शरीर धारण करत याचे तीन वर्ण झाले आहे. या वेळेस कृष्णवर्णचा झाला आहे, म्हणून याचे नाव कृष्ण असेल.  
 
तुझ्या मुलाचे नाव आणि रूपतर मोजणीच्या पलीकडे आहे, त्यातून गुण आणि कर्म अनुरूप काही मला माहीत आहे. दुसरे लोकांना हे माहीत नाही आहे. हा तुमच्या गोप-गो आणि गोकुलला आनंदित करत तुमचे कल्याण करेल. याच्यामुळे तुम्ही सर्व अडचणींपासून मुक्त राहाल.  
 
या पृथ्वीवर जे देव म्हणून याची भक्ती करतील त्यांना शत्रू देखील पराजित करू शकणार नाही. ज्याप्रमाणे विष्णूचा जप करणार्‍यांना असुर पराजित करू शकत नाही. हा तुमचा मुलगा सौंदर्य, कीर्ती, प्रभाव इत्यादींमध्ये विष्णूप्रमाणे असेल. म्हणून याचे लालन पालन फारच सावधगिरीने करावे लागणार आहे. या प्रकारे कृष्णाबद्दल आदेश देऊन गर्गाचार्य आपल्या आश्रमाकडे गेले.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगळा गौरी पूजा व्रत, आरती, कथा, व उद्यापन