Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जन्माष्टमीला करा कुठलेही 2 उपाय आणि श्रीमंत व्हा...

जन्माष्टमीला करा कुठलेही 2 उपाय आणि श्रीमंत व्हा...
आम्ही तुम्हाला काही असे ज्योतिषीय उपचार सांगत आहोत, ज्यांना तुम्ही कृष्णाष्टमीच्या दिवशी कराल तर कृष्णाची कृपा तुमच्यावर सदैव राहील. त्यांना प्रसन्न करून तुम्ही विभिन्न देवतांचा आशीर्वाद घेऊ शकता.  
 
पहिला उपाय
हा उपाय तुमच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यास आणि तुम्हाला धनवान बनवण्यासाठी आहे. या उपायानुसार तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी   कृष्णाला पांढरी मिठाई किंवा खिरीचा प्रसाद द्या. या खिरीत तुळशीचे पान आवश्यक घाला. या मुळे कृष्ण लवकर प्रसन्न होतात.

दुसरा उपाय
webdunia
जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा अभिषेक केल्याने देखील तुमच्या आर्थिक स्थितीत सुधार होतो. तुम्ही या दिवशी दक्षिणावर्ती शंखात जल भरून कृष्णाचा अभिषेक करा. या उपायामुळे तुमच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि साधक श्रीमंत होतो.  
 

तिसरा उपाय
webdunia
जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आता जो उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहे तो पूर्ण भक्ती भावाने केला तर त्याचा नक्कीच फळ मिळेल. 
webdunia
या उपायानुसार जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून, स्नानादि करून कुठल्याही कृष्णाच्या मंदिरात जाऊन तेथे तुळशीच्या माळेने पुढे सांगण्यात येत असणार्‍या मंत्राचे 11 माळा जप करावे आणि शेवटी कृष्णाला पिवळे वस्त्र व तुळशीचे पान अर्पित करावे.  
मंत्र – “क्लीं कृष्णाय वासुदेवाय हरि: परमात्मने प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:”

चवथा उपाय
webdunia
जर तुम्ही मंत्राचा जप करू शकला नाही तर, फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र, पिवळे फळ व पिवळे धान्य दान करू शकता. याने देखील कृष्ण प्रसन्न होतो तसेच लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावर सदैव बनून राहते. 

पाचवा उपाय
webdunia
हा उपाय ते लोक करू शकता ज्यांनी आपल्या घराच्या मंदिरातच बाल गोपाळाला स्थापित करून जन्माष्टमीचा सण साजरा करण्याची योजना आखली असेल.   
 
उपायानुसार जन्माष्टमी आरंभ होते अर्थात रात्री ठीक 12 वाजता कृष्णाचे केशर मिश्रित दुधाने अभिषेक करा. हा उपाय तुम्हाला श्रीमंत करू शकतो, कृष्ण कधीही असे जातकाच्या तिजोरीत धनाभाव होऊ देत नाही.

सहावा उपाय 
webdunia
आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी किंवा त्याला योग्य बनवून ठेवण्यासाठी अजून एक उपाय आहे, जो कोणीपण करू शकतो. त्यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करा आणि कृष्णाला रुपये अर्पित करा. पूजा संपल्यानंतर हे रुपये आपल्या पर्समध्ये ठेवा. याने तुमचा खिसा कधीही रिकामा राहणार नाही.

सातवा उपाय  
webdunia
शेवटचा उपाय या प्रकारे आहे - जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला गायीच्या तुपाचा दिवा लावून
ॐ वासुदेवाय नम: मंत्र बोलताना तुळशीची 11 वेळा परिक्रमा करा. याने जीवनातील सर्व दुःख दूर होतील.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'तिथे' आहेत तब्बल 1 कोटी शिवलिंग