Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shree Krishna Janmashtami 2023 कृष्ण जन्माष्टमी 6 की 7 सप्टेंबर रोजी साजरी होईल ? जाणून घ्या मुहूर्त

janamashtami 2022
, सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (09:50 IST)
Janmashtami 2023 Date श्रीकृष्णाच्या जयंतीला जन्माष्टमी म्हणतात. असे मानले जाते की याच दिवशी भगवान विष्णूने कृष्णाच्या रुपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी भक्त त्यांच्या मूर्तीसाठी पूर्ण भक्तीभावाने उपवास ठेवतात आणि पूर्ण विधीपूर्वक पूजा करतात. श्री कृष्णासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ज्यात पालखी सजविली जाते आणि श्रीकृष्णाच्या जयंतीची कथा नाटक किंवा चित्रपटाद्वारे चित्रित केली जाते.
 
कधी आहे जन्माष्टमी  2023 | Janmashtami 2023 Date
पंचांगानुसार, या वर्षी श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर, दुपारी 3.37 वाजता सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबरला दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल.
 
याशिवाय रोहिणी नक्षत्र 6 सप्टेंबर रोजी सकाळी 9.21 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10.25 वाजता समाप्त होईल.

मान्यतेनुसार श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला होता, त्यामुळे कृष्ण जन्माष्टमी 6 सप्टेंबरलाच साजरी केली जाईल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त रात्री 11:47 पासून सुरू होऊन 12:42 पर्यंत असेल. असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनात समृद्धी येते.
 
जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचे बालस्वरूपाचा जन्म उत्सव साजरा करावा.
जन्मानंतर त्यांना शंखात दूध टाकून अभिषेक करावा. दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल या पाच गोष्टींनीही अभिषेक करू शकता.
अभिषेकनंतर कन्हैयाला सुंदर कपडे घाला, मुकुट घाला आणि त्यांना सुसज्ज झुल्यात बसवा.
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी धार्मिक स्थळी जाऊन फळे आणि धान्य दान करा.
लहान कान्हासाठी बासरी आणि मोराची पिसे आणा. पूजेच्या वेळी ते परमेश्वराला अर्पण करावे.
जन्माष्टमीच्या दिवशी लहान कान्हाला लोणी आणि साखरेचा प्रसाद द्या. तसेच कान्हाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करावा.
एक ते पाच वर्षांच्या कोणत्याही मुलाला तुमच्या बोटाने लोणी- साखर चाखायला द्या.
या दिवशी गाय- वासराची मूर्ती किंवा फोटो घरी आणा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवून त्यांची पूजा करा.
गायीची सेवा करा. गायीला चारा किंवा भाकरी करून खायला द्या आणि आशीर्वाद घ्या.
परमेश्वराला पिवळे चंदन अर्पण करा. पिवळे वस्त्र परिधान करून हरसिंगार, पारिजात किंवा शेफाली यांची फुले अर्पण करावीत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Offer Shivmuth to shiv शिवामूठ (शिवमुष्टीव्रत) कसे करावे