Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कृष्णाला का दाखवतात 56 व्यंजनाचा नैवेद्य

कृष्णाला का दाखवतात 56 व्यंजनाचा नैवेद्य
श्री श्रीकृष्णाने इंद्राच्या प्रकोपाने ब्रजवासींना वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत सतत 7 दिवस स्वत:च्या डोक्यावर उचलून ठेवले होते. एवढेच नव्हे तर या 7 दिवसात श्री-कृष्ण उपाशी होते. ते पाण्याची एक थेंब देखील प्यायले नव्हते. यानंतर गावकर्‍यांनी त्यांना 7 दिवस आणि 8 पहर या हिशोबाने 7X8=56 प्रकाराचे व्यंजन बनवून खाऊ घातले, तेव्हापासून '56 भोग' परंपरा सुरू झाली.
 
56 सख्या आहे 56 भोग
मान्यतेप्रमाणे गौलोकात श्रीकृष्ण राधिकासोबत एका दिव्य कमळावर विराजित होते, ज्या कमळावर ते विराजित होतात त्या कमळाच्या 3 थरांमध्ये 56 पाकळ्या असतात. प्रथम थरात 8, दुसर्‍यात 16 आणि तिसर्‍यात 32 पाकळ्या असतात. आणि प्रत्येक पाकळीवर एक प्रमुख सखीसह मध्ये प्रभू विराजित असतात. येथे 56 संख्येचा हाच अर्थ आहे. 56 भोगामुळे श्रीकृष्ण आपल्या सखींसह तृप्त होतात.
 
जेव्हा गोपिकांनी श्रीकृष्णाला भेट दिली 56 भोगाची
श्रीमद्भागवत कथेनुसार कृष्णाच्या गोपिकांनी त्यांना पती रूपात प्राप्त करण्यासाठी 1 महिन्यापर्यंत यमुनेत सकाळी न केवळ स्नान केले बलकी कात्यायिनी देवीची पूजा -अर्चना देखील केली. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांची मनोकामना पूर्तीसाठी सहमती दर्शवली. तेव्हा व्रत समाप्ती आणि मनोकामना पूर्ण झाल्यावर गोपिकांनी 56 भोगाचे आयोजन केले होते.
 
56 भोगाचे गणित
सहा रस किंवा स्वाद अर्थात कडू, तिखट, कसैला, अम्ल, नमकीन आणि गोड याच्या मेळ करून 56 प्रकाराचे व्यंजन तयार करता येतात. 56 भोग अर्थात ते सर्व पदार्थ जे देवाला अर्पित करता येतात.
 
56 भोगात सामील व्यंजनांचे नावे
भात, सूप (डाळ), प्रलेह (चटनी), सदिका (कढी), दधिशाकजा (दह्याची शाकाची कढी), सिखरिणी (शिकरण), अवलेह (सरबत), बालका (बाटी), इक्षु खेरिणी (मोरब्बा), त्रिकोण (शर्करा युक्त), बटक (वडा), मधु शीर्षक (मठरी), फेणिका (फेणी), परिष्टाश्च (पूरी), शतपत्र (खजला), सधिद्रक (घेवर), चक्राम (मालपुआ), चिल्डिका (चोला), सुधाकुंडलिका (जिलबी), धृतपूर (मेसू), वायुपूर (रसगुल्ला), चन्द्रकला (पाकातली), दधि (महारायता), स्थूली (थुली), कर्पूरनाड़ी (लवंगपुरी), खंड मंडल (पाकातले शंकरपाळे), गोधूम (सांजा), परिखा, सुफलाढय़ा (बडीशेप युक्त), दधिरूप (बिलसारू), मोदक (लाडू), शाक (साग), सौधान (लोणचे), मंडका (मोठ), पायस (खीर), दधि (दही), गोघृत, हैयंगपीनम (लोणी), मंडूरी (साय), कूपिका, पर्पट (पापड), शक्तिका (सीरा), लसिका (लस्सी), सुवत, संघाय (मोहन), सुफला (सुपारी), सिता (वेलची), फळं, तांबूल, मोहन भोग, लवण, कषाय, मधुर, तिक्त, कटु, अम्ल।

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जन्माष्टमी 2019: 10 रुपयाच्या विशेष नैवेद्य दाखवा, प्रसन्न होतील श्रीकृष्ण