Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जन्माष्टमीला, तुमच्या राशीनुसार कान्हाला सजवा आणि नैवेद्य दाखवा

webdunia
शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (11:41 IST)
जन्माष्टमीचा पवित्र सण दरवर्षी श्रावण महिन्यात कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा केला जातो. या वर्षी ही शुभ तारीख 30 ऑगस्ट रोजी पडत आहे. देशभरातील लोक श्री कृष्णाची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतात. अनेक लोक भगवान श्रीकृष्णाचे व्रत ठेवतात. यासह, ज्या लोकांच्या घरी ठाकूर जी विराजमान आहेत, ते त्यांना विशेष सजवतात आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करतात. असे मानले जाते की यामुळे भगवान श्रीकृष्णाचे अपार आशीर्वाद मिळतात. ज्योतिष शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या राशीनुसार, श्रीकृष्णाचा श्रृंगार केला आणि नैवेद्य दाखवलं तर अपेक्षित परिणाम प्राप्त होतात.
 
मेष
मेष राशीच्या लोकांनी या जन्माष्टमीला श्री कृष्णाला लाल वस्त्रांनी सजवावे. आणि त्यांना माखन मिश्रीचा नैवेद्य दाखवावा.
 
वृषभ
या लोकांनी पांढरे वस्त्र परिधान करवून मुरलीधरला लोणी अर्पित करावं. असे मानले जाते की यामुळे त्यांच्या जीवनातील समस्या दूर होतील.
 
मिथुन
या राशीच्या लोकांनी हिरवे वस्त्र परिधान करून चंदनाचं तिलक लावावं. कृष्णाला दही अर्पित करावं आणि हात जोडून प्रार्थना करावी.
 
कर्क 
या राशीच्या लोकांनी या जन्माष्टमीला श्रीकृष्णांना पांढऱ्या वस्त्रांनी सजवावे. तसेच त्यांना दूध आणि केशर अर्पित करावं.
 
सिंह 
या राशीच्या लोकांनी गुलाबी रंगाच्या कपड्यांनी कान्हाजींना सजवावे. तसेच अष्टगंधाचे टिळक लावूनमाखन-मिश्रीचा प्रसाद म्हणून अर्पण करावा.
 
कन्या 
या लोकांनी कान्हाजीला हिरव्या रंगाच्या कपड्यांनी सजवावं आणि त्यांना मावा अपिर्त करावा.
 
तूळ
या लोकांनी कान्हाला गुलाबी कपडे घालावेत. त्यानंतर त्यांना तूप अर्पण करावं.
 
वृश्चिक
या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला लाल वस्त्रांनी सजवावं. त्यानंतर कान्हाजीला लोणी किंवा दही अर्पित करावं.
 
धनू
या राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. यानंतर, त्यांना फक्त पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी.
 
मकर
या राशीच्या लोकांना निळे कपड्यांनी कान्हाला सजवावं. पूजेनंतर, कान्हाजीला साखरेचा नैवेद्य अर्पण करावा.
 
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांनी या जन्माष्टमीला ठाकूरजीला निळ्या वस्त्रांनी सजवावे. त्यानंतर त्यांची पूजा करुन त्यांना बालूशाहीचा नैवेद्य दाखवावा.
 
मीन
या राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि कुंडल घालावे. नंतर केशर आणि बरफी अर्पित करावी.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

श्रीकृष्ण जन्माष्टमी: चुकुनही करू नका ही कामे