Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात जन्माष्टमीला दहीहंडीची परवानगी नाही, कडक नियमांच्या आणि निर्बंधांच्या कक्षेत साजरा केला जाईल गणेशोत्सव;जाणून घ्या

राज्यात जन्माष्टमीला दहीहंडीची परवानगी नाही, कडक नियमांच्या आणि निर्बंधांच्या कक्षेत साजरा केला जाईल गणेशोत्सव;जाणून घ्या
, बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (08:04 IST)
यंदा महाराष्ट्रात जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा वार्षिक उत्सव होणार नाही.कारण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंडळांना आवाहन केले आहे की,मानवतेच्या आधारावर त्यांनी लोकांच्या आरोग्याला प्राथमिकता द्यावी आणि आणखी काही काळ सणांच्या कार्यक्रमांपासून दूरच रहावे.
 
ठाकरे यांनी मंडळाच्या पदाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत म्हटले की,कोरोना महामारीमुळे लोक अजूनही उपजिविकेसाठी संघर्ष करत आहेत.महाराष्ट्रातील मंडळे आणि गोविंदा पथकांनी राज्य सरकारला विनंती केली होती की,छोट्या प्रमाणात तरी दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी,कारण सराव सत्र अगोदरपासूनच सुरू झाले आहे.
 
मागील आठवड्यात राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत दहिहंडी समन्वयक समितीने म्हटले होते की,ते दहीहंडीसाठी तीन ते चारच थर लावतील आणि दोन्ही डोस घेतलेले लोकच कार्यक्रमात सहभागी होतील.
 
एका वृत्तपत्राने काही सदस्यांच्या संदर्भाने लिहिले आहे की,जर गणेशोत्वस छोट्या प्रमाणात साजरा केला जाऊ शकतो तर दहीहंडी उत्सवासाठी सरकारने परवानगी दिली पाहिजे.भाजपा आमदार राम कदम यांनी म्हटले आहे की,नेहमी प्रमाणे यावर्षी दहीहंडी कार्यक्रम आयोजित करू,परंतु उत्सवात किती लोक सहभागी होतील,हे आम्ही सरकारकडून देण्यात आलेल्या सवलतीवरच ठरवू. यासाठी राज्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाड कोर्टाकडून राणे यांना जामीन मंजूर