Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीकृष्णाकडून शिकण्यासारखे जीवन मंत्र, यशस्वी व्हाल

श्रीकृष्णाकडून शिकण्यासारखे जीवन मंत्र, यशस्वी व्हाल
, सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (13:34 IST)
संघर्ष
जन्म झाल्यापासून देह त्यागेपर्यंत कृष्णाच्या आविष्यात संकट येत गेले तरी संघर्ष करणे हे भाग आहे म्हणून परिस्थितीपासून तोंड न वगळता त्यांचा सामाना करण्याची ताकद देतो कान्हा. कारण कर्म हेच कर्तव्य आहे विसरता कामा नये.
 
आरोग्य
कान्हाला लोणी खूप आवडायचं अर्थात आरोग्यासाठी योग्य त्या खाद्य पदार्थांचे सेवन करावे असा संदेश उपयोगी पडेल. शुद्ध, बल प्रदान करणार्‍या पदार्थांचे सेवन करावे आणि निरोगी राहावे.
 
ज्ञान
कृष्णाने 64 ‍दिवसात 64 कलांचे ज्ञान मिळवले केले होते. अर्थात शिक्षा केवळ पुस्तकी अभ्यास नसून व्यक्तित्व विकासासाठी उपयोगी पडेल अशी असावी. केवळ अभ्यासत नव्हे तर इतर कलांमध्ये देखील पारंगत असणे कधीही फायद्याचे ठरेल.
 
नाते-संबंध
कृष्णाला ज्याने कोणी प्रेमाने हाक मारली तो पूर्णपणे त्यांचा झाला. त्याने कधीही लोकांना सोडले नाही मग तो बालपणाचा मित्र सुदामा का नसो. नातलगांसाठी आणि सत्यासाठी त्यांनी युद्ध जिंकले. अर्थात आपण कितीही श्रेष्ठ असला तरी जीवनात नाती जपणे हे आवश्यक आहे.
 
दूरदृष्टी 
पांडवांना कौरवांशी युद्ध करावं लागू शकतं हे जाणून त्यांनी आधीपासूनच पांडवांना सामर्थ्यवान आणि शक्तिवान होण्यासाठी भाग पाडलं. अर्थात पुढील परिस्थिती लक्षात घेऊन स्वत:ला मानसिक आणि शारीरिक रूपाने तयार करणे हे कधीही श्रेष्ठ ठरेल.
 
शांत
अनेकदा अपमान सहन करून देखील कृष्ण हसतमुख असायचे, स्थिर आणि शांत असायचे. अर्थात परिस्थितीचा सामना शांत बुद्धीने केल्यास यश नक्कीच मिळतं. क्रोध आणि आवेशामध्ये येऊन वेळ-प्रसंग न बघता घेतलेले निर्णय धोकादायक ठरतात.
 
अहंकार सोडणे
स्वत: श्रेष्ठ असून देखील कृष्णाने कधी कोणाच्या राज्यावर डोळा ठेवला नाही आणि युद्ध जिंकल्याचे श्रेय देखील घेतले नाही. अर्थात स्वत:ला अहंकारापासून दूर ठेवावे. आपली किंमत दुसर्‍यांना कळू द्यावी त्यासाठी स्वत: चे कौतुक स्वत: करत बसू नये आणि श्रेष्ठ असल्याचं अहंकार देखील बाळगू नये उलट नि:स्वार्थ दुसर्‍यांची मदत करत राहावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोकुळाष्टमी विशेष : लोणी