प्रो कबड्डी लीगच्या 8 व्या हंगामातील (PKL) 92 वा सामना हरियाणा स्टीलर्स आणि बंगाल वॉरियर्स (HAR vs BEN) यांच्यात खेळला जाईल. उभय संघांमधला हा सामना 4 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये खेळवला जाईल. हा सामना 7:30 वाजता सुरु होईल.
PKL 8 मध्ये हरियाणा स्टीलर्सने आतापर्यंत 15 सामने खेळले आहेत. त्यांनी 6 सामने जिंकले आहेत आणि 6 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. 3 सामने बरोबरीत संपले आहेत. तो 43 गुणांसह 43व्या स्थानावर आहे. हरियाणा स्टीलर्सला मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे, बंगाल वॉरियर्सने आतापर्यंत 15 पैकी 7 सामने जिंकले आहेत आणि 7 सामने गमावले आहेत. त्यांचा एक सामना बरोबरीत संपला आणि ते 41 गुणांसह गुणतालिकेत 10व्या स्थानावर आहेत. बंगाल वॉरियर्सला त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
हरियाणा स्टीलर्स
विकास कंडोला, मीतू, जयदीप कुलदीप, सुरेंदर नाडा, मोहित, अंकित आणि रोहित गुलिया.
बंगाल वॉरियर्स
मनिंदर सिंग, सुकेश हेगडे, रण सिंग, अमित नरवाल, अबोझर मिघानी, विशन माने आणि मोहम्मद इस्माईल नबीबक्ष.