खाद्य तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकार ने घेतला आहे. त्यामुळे आता सर्व सामान्य माणसांना दिलासा मिळणार आहे. गुरुवारी केंद्र सरकार कडून जारी झालेल्या आदेशानुसार, 6 राज्य वगळून संपूर्ण देशात खाद्य तेल आणि तेलबियांचा साठा मर्यादित करण्याच्या निर्णयामुळे ही मर्यादा 30 जून 2022 पर्यंत असणार आहे. मागील वर्षी खाद्य तेल आणि तेलबियांच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यतेवर याचा परिणाम झाला होता. आता या वाढीव दरांना केंद्र सरकारने कमी केल्याच्या निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य माणसांना दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकार ने जारी केलेल्या हा आदेश तात्काळ लागू होऊन याची अंमलबजावणी 30 जून 2022 पर्यंत होईल.असे म्हटले आहे. या आदेशानुसार, किरकोळ विक्रेते 30 क्विंटल खाद्यतेल आणि 100 क्विंटल तेलबियांहून अधिकचा साठा करू शकणार नाही. तर घाऊक विक्रेते 500 क्विंटल खाद्य तेल आणि 2000 क्विंटल तेलबियांचा साठा करू शकणार नाही.
गेल्या वर्षी देशात खाद्य तेलाच्या दरांमध्ये वाढ झाली होती. मोहरीच्या तेलाच्या भावात वाढ झाल्यामुळे सरकारने मोहरीच्या तेलाच्या मिश्रणावर बंदी घालण्यात आली होती. या मुळे मोहरीच्या तेलाचे दर वाढले. या मुळे सर्वसामान्य लोकांना त्रास झाला होता. मात्र आता सरकारने वाढत्या किमतीपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा या साठी योग्य पावले उचलली आहेत.
या निर्णयात काही राज्यांना विशेष सूट दिली आहे. या निर्णयामुळे मर्यादेपेक्षा जास्त साठा करता येऊ शकतो. मात्र या साठी केंद्र सरकारने निश्चित केलेली साठाची मर्यादा पाळावी लागेल. उत्तर प्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, आणि बिहार या राज्याला सूट मिळाली आहे. या व्यतिरिक्त आयात निर्यात कोड क्रमांक असलेले निर्यातदार, रिफायनर्स, मिलर्स, एक्सट्रॅकटर्स, घाऊक विक्रेते आणि डीलर्स यांना सूट देण्यात आली आहे. त्यांना साठा कोणत्या माध्यमातून प्राप्त झाला आहे याची माहिती त्यांना द्यावी लागणार आहे.