कारगिल युद्धाच्या वेळी भारतातील एकमेव महिला युद्धात लढत होती. आणि ती म्हणजे गुंजन सक्सेना. गुंजन पायलटच्या(वैमानिक) दलातून एकमेव महिला होती. वर्ष 1999 मध्ये गुंजन निव्वळ 25 वर्षाच्या होत्या. जेव्हा त्यांची 132 फॉरवर्ड एरिया कंट्रोल (FAC) मध्ये पोस्टिंग झाली होती. युद्धाच्या सुरुवातीस त्यांना श्रीनगर जाण्यास सांगितले होते. एका आर्मी ऑफिसरच्या मुलीला अर्थातच गुंजनला हे काही अवघड काम नव्हते. उधमपुरातून श्रीनगर जाण्यासाठी त्यांनी आपल्या आई वडिलांना फोन वरून माहिती पुरवली. एका आर्मी ऑफिसर होण्याच्या नात्याने तिच्या वडिलांनी तिच्या कामामध्ये हस्तक्षेप करणं गरजेच समजले नाही. आणि त्या श्रीनगरला निघून गेल्या.
कारगिल युद्धाच्या सुरुवातीस कोणाला ही कल्पना नव्हती की हे एवढ्या मोठ्या युद्धाचे रूप घेणार आहे. श्रीनगरात त्या वेळी 4 हेलिकॉप्टर होते. त्या पैकी चीता नावाच्या हेलिकॉप्टरला गुंजन उडवत होत्या. 10 पायलटच्या (वैमानिकांच्या) संघात त्याच एकमेव महिला होत्या. त्यामुळे त्यांचा सहकारी मित्रांना हे आवडले नव्हते. पण काही वेळेनंतर त्या ऑफिसरांना हे समजले. तरी युद्धाच्या वेगवान होण्याचा परिस्थितीत असाईनमेंट देण्यापूर्वी त्यांना विचारले जात असे की आपण त्यासाठी सज्ज आहात का?
गुंजन त्या पायलटांपैकी होत्या ज्या (सर्विलांस) पाळत ठेवण्यासाठी पाठविले जात असे. 13 हजार फुटाच्या उंचावर गुंजन आपल्या हेलिकॉप्टरला हेलिपॅड वर उतरवत असे. जे कोणत्याही नवख्या पायलटासाठी शक्य नव्हते. कारण त्या भागात शत्रूची गोळी लागण्याची भीती होती. पण गुंजन कित्येकदा आपले कर्तव्य बजावत आपल्या हेलिकॉप्टरने जखमी सैनिकांची मदत करत असे. त्याच बरोबर सैनिकांना औषध पुरवणे, जेवण आणि बऱ्याच वस्तूंची पुरवणी करत असे. पायलट गुंजन ने 20 दिवसात अशी दहा मोहिमे पूर्ण केली. त्या नंतर युद्धामधून लहान हेलिकॉप्टर काढून फायटर हेलिकॉप्टर बसविण्यात आले होते. गुंजन एका आर्मी कुटुंबाशी निगडित होती. जेथे त्यांचे वडील ए.के.सक्सेना आणि आई होती. आई वडिलांना त्यांचा कामाच्या जोखमीबद्दल चांगलेच ठाऊक असे. पण त्यांनी आपल्या मुलीच्या कामात कधीही हस्तक्षेप केले नाही. आणि तिला पूर्ण निष्ठेने काम करण्याचे स्वातंत्र्य दिले.