Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वर्धा लोकसभा निवडणूक 2019

वर्धा लोकसभा निवडणूक 2019
मुख्य लढत : रामदास तडस (भाजप) विरुद्ध चारुलता टोकस (काँग्रेस)
 
या मतदार संघात दोन खेळांडूमध्ये निवडणूकीचा थेट सामना आहे. रामदास तडस हे प्रख्यात कुस्तीपटू असून १९६८ मध्ये तडस यांनी नागपूर केसरीचा पुरस्कार पटकाविला. १९७६, १९७८, १९८०, तसेच १९८२ नंतर सलग ४ वेळा त्यांनी कुस्तीचा विदर्भ केसरी पुरस्कार पटकाविला आहे. ते मागील १८ वर्षापासुन राज्य कुस्तीगीर परिषदेचे सल्लागार आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड. चारूलता टोकस या रायफलमध्ये राष्ट्रीय नेमबाज आहेत. १९८५ ते १९९१ या कालावधीत त्यांनी विविध राष्ट्रीय स्पर्धेत नेमबाजी केली. आशियाई क्रिडा स्पर्धेत त्यांना रौप्य पदक मिळाले आहे. १९९१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पहेलवान असलेल्या रामदास तडस यांनी काँग्रेसचा पराभव केला होता.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रामटेक लोकसभा निवडणूक 2019 Ramtek Lok Sabha Election 2019