Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दक्षिण मुंबई लोकसभा निवडणूक 2019

दक्षिण मुंबई लोकसभा निवडणूक 2019
, शनिवार, 4 मे 2019 (14:58 IST)
मुख्य लढत : अरविंद सावंत (शिवसेना) विरुद्ध मिलिंद देवरा (काँग्रेस)
 
देवरा यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या निवडणुकीत अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा एक लाखापेक्षा जास्त मतांनी दणदणीत पराभव केला होता.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा निवडणूक 2019