Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रायगड लोकसभा निवडणूक 2019

रायगड लोकसभा निवडणूक 2019
, शनिवार, 4 मे 2019 (14:27 IST)
मुख्य लढत : अनंत गीते (शिवसेना) विरुद्ध सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
या मतदार संघात अतिशय अतितटीची लढत आहे. अनंत गीते हे सहाव्यांदा रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. १६ व्या लोकसभेत ते अवजड उद्योग मंत्री म्हणून कार्यभार पाहत आहेत. शिवसेनेच्या ज्येष्ठ खासदारांमध्ये अनंत गीते यांचे नाव घेतले जाते. त्यांनी नगरसेवक पदापासून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. १९८५ ते १९९२ काळात त्यांनी मुंबई महानगरपालिकेत काम केले. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. १९९६ मध्ये पहिल्यांदा ते खासदार म्हणून निवडून आले होते. आतापर्यंत त्यांनी संसदेच्या अनेक समित्यांमध्ये काम केलेले आहे. २०१४ च्या निवडणुकीत केवळ २१०० मतांनी निवडून आलेले केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते बनले.
 
राष्ट्रवादीकडून माजी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी त्यांच्या कर्तृत्वाने रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद दिली आहे. तटकरे यांच्या कुटुंबात कलह निर्माण झाला होता तो संपवण्यातदेखील त्यांना बऱ्यापैकी यश आले आहे. त्यांच्या कन्या अदिती ठाकरे तटकरे या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नांदेड लोकसभा निवडणूक 2019