राहुल गांधी यांची सभा नुकतीच संगमनेर येथे पार पडली आहे. यावेळी ते बोलतांना म्हणाले की सत्तधारी भाजपने आश्वासन दिलेल्या 15 लाखांचं काय झाले, मात्र काँग्रेसने आश्वासन दिलेल्या न्याय योजनेचा देशाच्या अर्थव्यवस्थेला कसा फायदा होणार असून 72 हजार रुपये अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळणार आहे असे सांगत त्यांनी विश्लेषण केलं. काँग्रेसने जाहीर केलेले 72 हजार रुपये अर्थव्यवस्थेचं नुकसान करणार नाहीत, उलट फायदाच करतील, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. या संगमनेर येथील सभेला ते उशिरा पोहोचले यामुळे राहुल गांधींनी जनतेची माफी मागतिली आहे.राहुल गांधींच्या प्रवास करत असलेल्या विमानात तांत्रिक बिघाडामुळे दिवसभरातील सर्व सभांना उशिर झाला. परिणामी त्यांना संगमनेरमध्येही नियोजित वेळेत पोहोचता आलं नाही असे स्पष्ट केले.
काँग्रेसने जाहीर केलेले जे 72 हजार रुपये आहेत ते देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी इंधन ठरणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशात नोटाबंदी करुन लोकांच्या खिशातला पैसा बँकात टाकला आहे यामुळे बाजारातील व्यवहार कमी आणि खरेदी कमी झाली, सोबतच उत्पादन घटलं आणि रोजगार गेले. मात्र जर काँग्रेसची सत्ता आली तर व लोकांना 72 हजार रुपये दिल्यास लोक त्या पैशातून खरेदी करतील, त्यामुळे मागणी वाढेल आणि रोजगार वाढतील. अर्थतज्ञांनी याबाबत माहिती दिली, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. शिवाय काँग्रेसची ही योजना अर्थव्यवस्थेसाठी एक इंधन असून बूस्ट देईल, अस राहुल म्हणाले आहेत. अहमद नगर येथून राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नगर येथील लढत चुरशीची झाली आहे.