Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 8 April 2025
webdunia

ममता यांनी 42 जागांची यादी केली जाहीर

Mamata list 42 vacancies list
, बुधवार, 13 मार्च 2019 (09:06 IST)
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी 42 जागांची यादी जाहीर केली. त्यामध्ये 41 टक्के महिला उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
 
तृणमूल काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत 40.5 टक्के महिला उमेदवार देणार असल्याचे ममता यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, मागील काळात दुर्गा पुजेवरून भाजपाकडून सतत ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करण्यात येत होते. पण, ममता यांनी लोकसभा निवडणुकीत नारी शक्तीला अधिक प्राधान्य देण्याचे ठरवून एकप्रकारे नारी शक्तीला बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हर्दिक पटेल यांचा अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश