Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठा क्रांती मोर्चा करणार सरकार विरोधात घरा घरात प्रचार

मराठा क्रांती मोर्चा करणार सरकार विरोधात घरा घरात प्रचार
मराठा क्रांती मोर्चा हे अंदोलन देशभर आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शांततेने पाऊले उचलत होती. तरीही मराठा समाजाला सक्षम आरक्षण देण्याबाबत सरकारला पूर्ण निष्फळ ठरले आहे. सरकारच्या या फसवेगिरीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना युती सरकाराच्या विरोधात प्रचार करणार आहे असे मराठा मोर्चा आणि ठोक मोर्चा यांनी पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निर्णय घेतला आहे. 
 
पत्रकार परिषदेत संजय सावंत, विजय घाडगे, मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी हे स्पष्ट करत पुढे सांगितले की, मराठा समाजाच्या वतीने एकूण ५८ मोर्चे काढले होते. मोर्चांमध्ये लाखोनी मराठा बांधव शांततेत रस्त्यावर उतरले, अंदोलना दरम्यान ४२ जण निधन पावले. मात्र यामध्ये सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही आर्थिक मदत दिली नाही. तसेच त्यांच्या कुटुंबातील कोणालाही नोकरी सरकारने मिळवून दिली नाही, आंदोलनावेळी १३ हजार ७०० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते गुन्हेसुद्धा अजूनही मागे घेतले  नाहीत. आरक्षण विरोधात कोणताही पक्ष किंवा उमेदवार असेल तर त्याला निवडणुकीमध्ये  पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक मराठा घरात जाऊन सरकार विरोधात मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, असे ही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा विद्यमान सरकारला जोरदार धक्का देईल असे चित्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये दहावीचा पेपर