Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीड मध्ये मुंडे विरुद्ध मुंडे खरीप रब्बी म्हणजे काय भाजपा उमेदवाराला माहित आहे का ?

बीड मध्ये मुंडे विरुद्ध मुंडे खरीप रब्बी म्हणजे काय भाजपा उमेदवाराला माहित आहे का ?
, शनिवार, 23 मार्च 2019 (17:23 IST)
बीडच्या विद्यमान खासदार डॉ प्रितम मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची हा राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सांभाळत आहेत. बहीण प्रितम मुंडे यांना टक्कर देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. 
 
धनंजय मुंडे यांनी पहाटे पाच वाजता घराबाहेर पडून मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांसोबत संवाद साधला आहे. सोबतच त्याच ठिकाणी छोटेखानी सभा देखील  घेतली आहे. फक्त आणि फक्त सहानुभूतीच्या जोरावर निवडून आलेल्या आमच्या बहिणाबाईचं कर्तृत्व काय, असा प्रश्न त्यांनी विचारला असून मला एकदा संधी द्या, अशी भावनिक साद धनंजय मुंडे यांनी नागरिकांना घातली आहे. मुंडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, भाजपचा हा उमेदवार सक्षम नसू, त्यांचा राजकाराणाशी काडीचा संबंध नाही. स्वर्गीय मुंडेसाहेबांचं निधन झाल्यावर राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला नव्हता, त्यावेळी त्या निवडणुकीस उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या होत्या. मुंडे साहेबांचं निधन झाल्यावर रिकाम्या झालेल्या जागेवर त्या राजकारणात आल्या. त्यापूर्वी त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्यांना खरीप काय आणि रब्बी काय माहित नाही, शहरातील प्रश्न काय आणि खेड्यातील प्रश्न काय याची जाण नाही. म्हणून अनेक प्रश्न प्रलंबित. फक्त वडिलांचं नाव घ्यायचं आणि मत मागायचं, लोकांना भावनिक करायचं, आता या सर्व गोष्टीला लोक वैतागले आहेत. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे हे सामान्य जनतेची भावना आहे. त्यामुळे आता बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे अशी जोरदार लढत दिसून येते आहे. बीड हा गोपीनाथ मुंढे यांचा गड असून अजूनही नागरिक गोपीनाथ मुडे यांच्यावर प्रेम करतात त्यामुळे आता नागरिक कोणत्या मुंडेना निवडून देतात हे येणारा काळ ठरवेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॉंग्रेस मध्ये अंतर्गत कलह अशोक चव्हाण देणार राजीनामा