Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशाची सुरक्षा, भ्रष्टाचार, विकास या मुद्यावर मी चर्चा करतो मात्र काहींना हा विजेचा धक्का - नरेंद्र मोदी

देशाची सुरक्षा, भ्रष्टाचार, विकास या मुद्यावर मी चर्चा करतो मात्र काहींना हा विजेचा धक्का - नरेंद्र मोदी
, सोमवार, 22 एप्रिल 2019 (18:35 IST)
देशाची सुरक्षा, भ्रष्टाचार, विकास या मुद्यावर मी चर्चा करतो मात्र काहींना विजेचा धक्का आहे त्या ठिकाणी बसतो आणि शिवराळपणा ते करू लागतात. पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाचा टक्का आणि मिळणारे संदेश हादरवून सोडणारे आहेत, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकच्या पिंपळगावमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपा सरकारच्या विकासकामांचा आढावा घेतला. 
 
मोदी यांनी यावेळी मराठीतून भाषणाची सुरुवात केली हे त्यांनी सर्व भाषणस्थळावर ठेवण्यात आलेल्या टेलीप्रॉम्पटरमुळे मोदींना मराठीत बोलता आले आहे. यावेळी ते म्हणाले की येथे जमलेल्या सर्व नाशिकवासियांना माझा नमस्कार! नाशिकच्या पवित्र भूमीत येऊन मी धन्य झालो आहे. नाशिकचे नाव घेतले की मला संस्कृतीचे सात रंग दिसू लागतात…पंतप्रधान मराठीत बोलताना पुढे म्हणाले की, या पुण्यभूमीचा पहिला रंग म्हणजे आदिमाया श्री सप्तश्रुंगी, दुसरा कुंभमेळा, तिसरा ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, चौथा रंग म्हणजे भगवान श्रीराम आणि माता सीता, पाचवा रंग अंजनेरी येथील श्री हनुमानाचे जन्मस्थान, सहावा रंग म्हणजे भगूर येथील वीर सावरकरांची जन्मभूमी आणि सातवा रंग म्हणजे समतेच्या लढ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंदोलन… अशा विविध रंगांनी नटलेले हे तिर्थक्षेत्र आहे. मी आज नाशिकच्या या पावनभूमीत येऊन धन्य झालो! असे मोदी म्हणाले आहेत. 
 
पुढे ते म्हणाले की भारताकडे वक्रदृष्टी करण्याअगोदर शंभर वेळा शत्रू विचार करतो. डोळ्यात डोळे घालून बोलणार हे मी मागील निवडणुकीत सांगितले होते, देशाचा जगात जयजयकार केवळ जनतेच्या मतदानामुळे शक्य झाला आहे.  भाजपा सत्तेत आल्यानंतर भारताच्या कानाकोपऱ्यात होणारे बॉम्बस्फोट थांबले असून, आतंकवाद्यांच्या कारखान्यात घुसून तळ उध्वस्त करून भारतीय वायू सेना सुरक्षित पुन्हा परतली आहे असे मोदी यावेळी म्हणाले आहेत. 
 
सरकारने दीड लाख गावांमध्ये वेलनेस सेंटर उभारले असून, वेगवान स्थितीत देशात रस्ते आणि गावागावात मोफत वीज पुरवठा सुरू केला आहे. प्रत्येक गावातील पोस्ट बँकिंग सुधारणा करून गरिबांना सुविधा दिल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात उडाण योजनेद्वारे वायूमार्ग अधिक सक्षम करत आहोत. नाशिकला लवकरच द्रायपोर्ट सुविधा उपलब्ध करून देणार. आदिवासींच्या शिक्षणासाठी देशभरात एकलव्य शाळा सुरू करत आहोत. वनउपज ला समर्थन मूल्य मिळून देत आहोत. शेतकऱ्यांना बँक खात्यात रक्कम येऊ लागली आहे. सगळ्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार हे सुनिश्चित, असल्याचेही मोदी यांनी सांगितले आहे. नाशिक नंतर मोदी यांची नंदुरबार येथे सभा झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एचडीएफसी बँकेचा सर्वर हॅक 67 लाख 88 हजार लंपास